शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सापडले दुर्मिळ 'ॲटलास मॉथ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:28 IST

विकास शहा शिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ॲटलास मॉथ" शिराळा येथील पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात ...

विकास शहाशिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ॲटलास मॉथ" शिराळा येथील पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले होते. आज, बुधवारी पुन्हा असेच फुलपाखरू सोमवार पेठेत मरिमी चौकात दिसले. हे पतंग (फुलपाखरू) सकाळी आठ वाजलेपासून संध्याकाळी सात पर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर व नंतर भिंतीवर विसावले होते. याचे पंखाच्या टोकाला नागाच्या तोंड व  आकार दिसत होता त्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शिवाजी गुरव, पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिले. जवळपास दहा इंच मोठे हे पतंग होते. महत्त्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाच्या तोंड व  आकार दिसत होता. नागाचे फुलपाखरू असल्याची  माहिती शहरात पसरताच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हे फुलपाखरू दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक आहे.

खास वैशिष्ट्य म्हणजे..त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला "एॅटलास माॅथ" म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. याचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात. शक्यतो रात्रीच दिव्यांचे प्रकाशाकडे आकर्षीत होणारे हे पतंगे निशाचर आहेत, क्वचितच ते दिवसा आढळतात.'या' झाडांवरच आढळतोसप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने ते दिसतात. हा पतंग दालचीनी, लींबू, जांभुळ, पेरू व लींबू वर्गीय झाडांवरच आढळतो. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस १०० ते २०० अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून आळी बाहेर येते. हे आळी ३५ ते ४० दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. एकविस दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येते. त्यानंतर अंडी घालून पतंगा मरतो.  अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जीव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

टॅग्स :Sangliसांगली