शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अरविंद पवारसह महिलेस जन्मठेप

By हणमंत पाटील | Updated: January 8, 2024 17:13 IST

कुरळपच्या आश्रमशाळेतील मुलींवरील अत्याचार प्रकरण;सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार

युनूस शेखइस्लामपूर : पाच वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या कुरळप (ता.वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश ए. एस.गांधी यांनी संस्थांचालकासह एका महिलेस चारवेळा जन्मठेप आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात स्वतंत्र शिक्षा दिली.दंडाची रक्कम न भरल्यास दोघांना आणखी शिक्षा भोगावी लागणार आहे.एकावेळी चार जन्मठेप देण्याचा हा न्यायालयाचा ऐतिहासीक निकाल ठरला.अरविंद आबा पवार (६६) आणि मनीषा चंद्रकांत कांबळे (४३,दोघे रा.कुरळप) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयाने मुक्तता केली.दंडाच्या रकमेतील प्रत्येकी ५० हजार रुपये अत्याचारित चार पीडित मुलींना तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्या. गांधी यांनी दिले आहेत.अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात बलात्कारासाठीच्या भारतीय दंडविधानातील विविध कलमाखाली आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार ही शिक्षा सुनावली.पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रावरून या अत्याचाराच्या घटनेची पोलीसांनी पोलखोल केली.त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.त्यावेळी मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहायक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती.दोघांविरुद्ध येथील न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले.त्यावर या खटल्याची सुनावणी सुरू होती.पीडित मुलींच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने हा इतक्या मोठ्या शिक्षेचा दणका आरोपींना दिला.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील आणि रणजित पाटील यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि महिला पोलीस सूर्यवंशी यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय