शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

उदयनराजेंसह १५ जणांवर खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: March 23, 2017 23:41 IST

नऊजणांना अटक : कंपनीच्या मालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खंडणी, हत्येच्या प्रयत्नाचे कलम

सातारा : लोणंद येथील सोना कंपनीच्या मालकाने दोन लाखांची खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना (दि. २७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.अशोक कांतिलाल सावंत (वय ४६,रा. यशवंतनगर, अकलूज माळशिरस, सध्या रा. हडपसर पुणे), रणजित अमृत माने (३३, रा. साखरवाडी, ता. फलटण),राजकुमार कृष्णात गायकवाड (२५,रा. होळ, ता. फलटण), सुकुमार सावता रासकर (३२, रा. लोणंद, ता. खंडाळा), धनाजी नामदेव धायगुडे (३२, रा. पाडळी, ता. खंडाळा), ज्ञानेश्वर दिलीप कांबळे (२९, रा. होळ, ता. फलटण), महेश आप्पा वाघुले (२५,रा. माळ-आळ लोणंद, ता. फलटण), अविनाश दत्तात्रय सोनवले (२८,रा. कोळकी, ता. फलटण) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.लोणंद येथील सोना कंपनीचे मालक राजीवकुमार बालकिसन जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीतील कामगार व्यवस्थित काम करत नसल्याने कंपनी काही महिने बंद ठेवली होती. त्यामुळे ठेकेदारीवर घेतलेल्या कामगारांना काढून टाकण्यात आले. मात्र, रणजित माने यांनी फोन करून पुन्हा कामावर कामगारांना घ्यावे लागेल, असे सांगितले. तसेच कंपनी व्यवस्थित सुरू ठेवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. भीतीपोटी मी १४ महिने २ लाख रुपये दिले. हे पैसे रणजित माने घेऊन जायचे; परंतु कंपनी तोट्यात आल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे पैसे देता आले नाहीत. त्यामुळे मानेंनी फोन केला. कंपनी सुरू झाली. मात्र तुम्ही पैसे दिले नाहीत ते द्या, असे सांगितले. दि. १३ मार्चला खासदार उदयनराजे यांचे स्वीय सहायक अशोक सावंत यांचा फोन आला. ‘महाराज बोलणार आहेत,’ असे म्हणून त्यांनी महाराजांना फोन दिला. कामगारांचं काय केलं. दि. १८ मार्चला साताऱ्याला मिटींगला या,’ असं उदयनराजे यांनी सांगितले. त्यानंतर रणजित माने यांनी १८ तारखेच्या मिटींगला जिल्हाधिकारी, एसपी असे सगळे येणार आहेत. आपण बैठकीला या, असा एसएमएस केला. दि. १८ मार्चला सकाळी साडेदहाला कंपनीतील इतर अधिकाऱ्यांसमेवत आम्ही सातारा येथील सर्किटहाऊवर आलो.दुपारी अडीच वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी मला खोलीमध्ये बोलावले. सोना कंपनीचा मालक कोण आहे? असे विचारल्यानंतर ‘मी कंपनीच्या प्रशासनाच्या वतीने येथे आलोय, असे त्यांना सांगितले. त्यानंतर उदयनराजे यांनी गालावर चापट मारली. ‘तुझ्याकडे पंधरा मिनिटांचा वेळ आहे. मुलाबाळांशी बोलून घे. पुण्यात राहतोस ना, चाकू आणा रे. तुम्ही मला ओळखला का?,’ असे उदयनराजेंनी विचारलं. ‘आपण भगवान आहात,’ असं त्यांना सांगितलं. यावर ते म्हणाले, ‘भगवान की माँ की.. कामगारांचे काम करणार की नाही सांग. मी प्रयत्न करतो,’ असं म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्या थोबाडीत मारली. ‘याला चांगली अद्दल घडवा रे,’ असे उदयनराजे यांनी सांगितल्यानंतर सगळ्यांनी मला धरून बाजूच्या खोलीमध्ये नेले. खाली पाडून छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. यावेळी मी विनवणी करून ‘डायबेटीस आणि बीपीचा पेशंट आहे,’ असे त्यांना सांगत होतो. तरीसुद्धा मला सगळ्यांनी बेदम मारहाण केली. मला मारत असताना माझ्या कंपनीतील सहकाऱ्यांना एका खोलीत कोंडून ठेवले होते. शहरातील एका खासगी रुग्णालयात गेल्यानंतरच मी शुद्धीवर आलो. माझ्या सहकाऱ्यांनी मला पुण्याला नेले. येथे उपचार घेतल्याना पुण्यातील पोलिसांनी तक्रार असेल तर द्या,’ असे सांगितले. मात्र मी भीतीपोटी तक्रार दिली नाही. परंतु सिटी स्कॅन करण्यासाठी गेल्यानंतर मला मारहाण झाल्याचे सांगितले. लोणंद पोलिसांना फोन करून घरी बोलावून घेतले. पोलिसांनी घरी येऊन माझी तक्रार घेतली. हा गुन्हा सातारा शहर हद्दीत घडल्यामुळे लोणंद पोलिसांकडून हा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. खंडणी स्वीकारणे, गर्दी मारामारी, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)उदयनराजेंना तात्पुरता अटकपूर्व जामीनदरम्यान, खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने अ‍ॅड. डी. व्ही. पाटील आणि ताहेर मणेर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी घेऊन न्यायालयाने उदयनराजे यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. ३१ मार्चला होणार आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यात !सर्किटहाऊवर जैन यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्किट हाऊसमधील घटनेच्या पूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अनुषंगाने आणखी बरेच काही पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.