शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीत तिकिट विक्रीत उच्चांक; प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारावर

By अविनाश कोळी | Updated: May 4, 2024 22:57 IST

सांगली स्थानकावरुन या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजार ३३० इतके नोंदले गेले आहे.

सांगली : मध्य रेल्वे प्रशासनाने सांगली स्थानकावरुन सुटणारी पहिली एक्सप्रेस म्हणून राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला हिरवा कंदिल दाखविल्यानंतर प्रवाशांनी या गाडीला मोठा प्रतिसाद दिला आहे. सांगली स्थानकावरुन या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजार ३३० इतके नोंदले गेले आहे.

सांगली-बंगळुरू चेन्नम्मा एक्सप्रेसच्या माध्यमातून सांगली रेल्वे स्थानकाला पहिलीच एक्सप्रेस मिळाली आहे. यापूर्वी एकही एक्सप्रेस सांगलीतून सुटत नव्हती. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुण्याखालोखाल सांगली रेल्वे स्थानकातून तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणावर होते. आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न देणारे हे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावरून नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी होती. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिली गाडी मिळाली आहे. याच गाडीला सांगली स्थानकावरुन प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत असून आरक्षित तिकिट विक्रीने शतकी उंबरठा ओलांडला आहे.चौकट

आरक्षित तिकिटांना प्रतिसादसांगली-बेंगळुरू राणी चेन्नम्मा एक्सप्रेससाठी २ मे रोजी सांगली स्थानकावरुन ११३ आरक्षित तिकिटांचे बुकिंग झाले. त्यातून प्रति फेरी ७० हजार ३३० रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले.

टू टिअर एसीची ७, थ्री टिअर एसीची १९, तर स्लिपरच्या ८८ तिकिटांचे बुकिंग करण्यात आले.याशिवाय सामान्य आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून ३ हजार ३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले.तिकिटांचा मोठा कोटासांगली स्थानक ते बंगळुरूपर्यंत ५६९ तिकिटांचा कोटा मिळाला आहे. www.irctc.co.in या संकेतस्थळावर किंवा सांगली स्थानकावरुन तिकीट बुकिंग करता येते. त्यामुळे सांगलीतून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.चौकट

बुकिंगसाठीचा सांगलीतून कोटास्लीपर क्लास - २८८ तिकीटएसी स्लीपर - ८९एसी स्लीपर फर्स्ट क्लास स्वतंत्र केबिन - १०

२५ थांबे मंजूर -सांगली ते बंगळुरूदरम्यान ही गाडी २५ स्थानकांवर थांबते. या गाडीत २१ डबे असून स्लीपर क्लासचे १०, एसी स्लीपरचे ४, एसी प्रथम दर्जाचे २ व अनारक्षित प्रवाशांसाठी ३ जनरल डबे आहेत. या गाडीत अनारक्षित जनरल तिकीट खरेदी करून जनरल डब्यातही प्रवास करता येईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी