शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

कवठेमहांकाळ तालुक्यात रंगले रक्तचरित्र, हल्लेखोरांचा कुकरीने डोक्यात, छातीवर आणि पोटावर सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 15:24 IST

Crimenews Sangli- बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या खुनापाठोपाठ पिंपळवाडी येथील माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर खोत याच्यावर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये अमर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे ९ च्या सुमारास घडली. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे. भर चौकात हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यात रंगले रक्तचरित्र, हल्लेखोरांचा कुकरीने डोक्यात, छातीवर आणि पोटावर सपासप वार

कवठेमहांकाळ : बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या खुनापाठोपाठ पिंपळवाडी येथील माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर खोत याच्यावर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये अमर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे ९ च्या सुमारास घडली. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे. भर चौकात हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की अमर खोत हा शहरातील थबडेवाडी सिद्धनाथ भवन हॉटेल मध्ये साडे ९ वाजता बसला होता. यावेळी अज्ञात दोघे दुचाकी वरून आले आणि काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी अमर खोत याच्यावर कुकरीने सपासप वार केले. त्याच्या डोक्यात, छातीवर आणि पोटावर वार केले. त्यामध्ये अमर खोत हा गंभीर जखमी झाला. तातडीने त्यास उपचारास सांगलीला हलवले असून त्याची प्रुकृती चिंताजनक आहे.

हॉटेल मालक विजय माने आणि बघ्यानी अमर खोतच्या मारेकऱ्यांना हुसकावून लावले. यामध्ये विजय माने हेही जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ शहरात तसेच तालुक्यात वातावरण तणावाचे बनले आहे. हे मारेकरी कोण याचा पोलीस शोध घेत आहेत. हा हल्ला पूर्व वैमनश्यातून झाला असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणी पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत हे संशयित असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अमर खोत हा भाचा त्यांचा  आहे.त्यामुळे हा हल्ला पूर्व वैमनश्यातून झाला असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली