शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सांगलीत रामकथा सोहळा, शोभायात्रेने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 18:16 IST

शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, घोडे, उंट

सांगली : हत्ती, घोडे, उंट, ढोल-ताशांचा कडकडाट, झांज व लेझीम पथकाच्या तालावर धरलेला ठेका, जय श्रीरामचा जयघोष आणि भगव्या झेंड्यांनी उजळलेला परिसर अशा धार्मिक वातावरणात सांगलीत निघालेल्या शोभायात्रेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. निमित्त होते रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे.कल्पद्रुम क्रीडांगणावर रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा आयोजित केला आहे. नेज (जि. बीड) येथील समाधान महाराज शर्मा मराठीतून रामकथा सांगणार आहेत. यानिमित्ताने गुरुवारी कलश शोभायात्रा झाली.राम मंदिर चौकातून ही शोभा यात्रा निघाली. जयंत सावंत आणि रामबीर सागवान परिवार मुख्य यजमान होते. शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, घोडे, उंट होते. लेझीम, धनगरी ढोल, वानरसेना, झांज पथकाने ताल धरला होता. राम, लक्ष्मण, जानकी, हनुमान यांच्या रूपातील मुलांचा रथ सजला होता. या मुलांना एकावेळी खांद्यावर उचलून घेण्यात आले आणि जल्लोष करत जय बोलो हनुमान की, असा गजर झाला. राम मंदिरपासून पुष्पराज चौक, वसंतदादा मार्केट यार्ड, महावीर उद्यान आणि तेथून नेमिनाथनगर असा प्रवास करत यात्रा क्रीडांगणावर पोहोचली.माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, नितीन शिंदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विनोद घोडावत, गुलशन अग्रवाल, नितीन झंवर, प्रसाद जगताप, राजेंद्र घोडावत, अध्यक्ष पन्नालाल त्रिवेदी, विश्वास गवळी, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, सचिव लक्ष्मण नवलाई, राहुल पाटील, पदाधिकारी ओमप्रकाश झंवर, अनिल मानधना, वसंत पाटील, गोपाळ बजाज, रोहित हिडदुग्गी, श्रीगोपाळ सारडा, रामनिवास बजाज, संजय डोडिया, सतीश मालू, अनिल मानधना, नितीन झंवर यांनी स्वागत केले.रामकथा, कीर्तनाला सुरुवातशोभायात्रेच्या सांगता झाल्यानंतर दुपारी रामकथा सांगण्यास सुरुवात झाली. समाधान महाराज शर्मा यांनी रामकथा मराठीतून सांगितली. सायंकाळी  कीर्तनाचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी योगसाधना, सर्वरोगनिदान शिबिर होणार आहे. तर रात्री श्रीगुरू कृष्णा महाराज चवरे यांचे कीर्तन होईल. 

टॅग्स :Sangliसांगली