शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

राजू शेट्टी, विलास शिंदे यांना जनसेवा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 16:54 IST

सांगली येथील नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना, तर राजमती पाटील जनसेवा पुरस्कार नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देराजू शेट्टी, विलास शिंदे यांना जनसेवा पुरस्कार जाहीरसुरेश पाटील यांनी केली घोषणा : सांगलीत २८ रोजी वितरण

सांगली : येथील नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना, तर राजमती पाटील जनसेवा पुरस्कार नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला.

येत्या शुक्रवारी, २८ रोजी सांगलीतील राजमती भवन येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राजमती पाटील ट्रस्टचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचे पुरस्कार कृषी क्षेत्राला अर्पण करण्यात आले आहेत. रोख २५ हजार, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी जे. बी. पाटील (पुणे) यांचाहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.पाटील म्हणाले की, १९९२ पासून श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, साहित्यिक, धार्मिक, तळागाळातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्काराचे २९ वे वर्ष आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी गेली २६ वर्षे शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहेत.

देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्रित करून ही चळवळ संपूर्ण देशभर नेण्याचे कार्य केले आहे. त्यांनी संसदेमध्ये वेळोवेळी शेतकऱ्यांचे तसेच कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. जिल्हा परिषद ते खासदार व्हाया विधानसभा, असा राजकीय आलेख उंचावणारे शेट्टी हे दूध, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले.

कर्जमाफी, हमीभाव, स्वामिनाथन् समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतीमालाची आयात-निर्यात आदी मुद्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.स्वाभिमानी अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् कंपनी सुरू करून कम्युनिटी फार्मिंगचा अभिनव प्रयोग केला. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरसह विविध पुरस्कारांनी शेट्टी यांना गौरविण्यात आले आहे.राजमती नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्काराचे मानकरी असलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी २०११ मध्ये परिसरातील सर्व शेतकºयांचे एकत्रित व्यावसायिक मॉडेल म्हणून सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी सुरू केली. आज हा प्रकल्प ७ हजार शेतकरी उत्पादकांशी संलग्न असून, विविध फळे व भाजीपाला पिकांतर्गत १५ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर नियंत्रण आहे. ही भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी शेतकऱ्यांची कंपनी बनली आहे.

याठिकाणी दैनंदिन ८५० टन फळे, भाजीपाला हाताळणीची सुसज्ज यंत्रणा आहे. ६५ एकर जमिनीवर शेकडो कोटींची गुंतवणूक करून शिंदे यांनी शीतसाखळी आणि फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. या प्रकल्पात फळभाज्यांचे निर्जलीकरण, आंबा प्रक्रियाही यशस्वीरित्या होते. केंद्रीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे ते केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य, तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य कृषी निर्यात धोरणाचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली