शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोन मंत्र्यांमुळेच कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:31 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची नोटीस बजावली. यामागे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील दोन मंत्र्यांमुळेच कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस : राजू शेट्टी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून आवाज दाबण्याचा उद्योग सुरू

सांगली : कडकनाथप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मोटारीवर कोंबड्या फेकल्याच्या गुन्ह्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना दोन वर्षाची हद्दपारीची नोटीस बजावली आहे. यामागे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत केला. या दडपशाही पध्दतीला जनतेनेच उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील तीस वर्षापासून चळवळीत काम करीत आहे. परंतु,असा वाईट अनुभव आतापर्यंत आलेला नाही. खून, बलात्कार, मटका, बनावट दारू विक्री यातील बहुतांशी आरोपी जामिनावर बाहेर आहेत. परंतु शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावली जात आहे, हा कोणता न्याय आहे? विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे.

सध्याचे सरकार काळजीवाहू आहे. मात्र सरकारमधील जिल्ह्यातील दोन मंत्री अधिकार नसतानाही सत्तेचा गैरवापर करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील हद्दपारीच्या कारवाईमागे त्यांचाच हात आहे.ते म्हणाले की, आचारसंहितेत मंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पोलिसांवर दबाव आणून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई केली जात आहे. दडपशाही होणार असेल तर आम्ही जनतेच्या प्रश्नांवर चळवळी करायच्या नाहीत का? १९९५ मध्ये युती सरकारच्या काळातही असे प्रकार घडले नव्हते. मात्र सध्याच्या सरकारकडून शासकीय यंत्रणांना हाताशी धरून आवाज दाबण्याचा उद्योग सुरू आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, किसान सभेचे उमेश देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली