शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेलभाडे सवलतीत बेदाणा, द्राक्षाचा समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:11 IST

Market Sangli- शेतीमालाच्या देशातर्गंत वाहतुकीसाठी केंद्र शासनाने किसान रेल सुरू केली आहे. शेतीमाल, फळांच्या वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलतही दिली जात आहे, पण अन्न उद्योग मंत्रालयाने शेतीमालाच्या यादीत बेदाणा व द्राक्षाचा समावेश केलेला नाही. या दोन्हींचा समावेश करण्याची मागणी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडे केल्याची माहिती सांगली व्हिजन सांगली फोरमचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देकिसान रेलभाडे सवलतीत बेदाणा, द्राक्षाचा समावेश करावासांगली व्हिजन सांगली फोरमचे सुरेश पाटील यांची रेल्वे व्यवस्थापकांशी चर्चा

सांगली : शेतीमालाच्या देशातर्गंत वाहतुकीसाठी केंद्र शासनाने किसान रेल सुरू केली आहे. शेतीमाल, फळांच्या वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलतही दिली जात आहे, पण अन्न उद्योग मंत्रालयाने शेतीमालाच्या यादीत बेदाणा व द्राक्षाचा समावेश केलेला नाही. या दोन्हींचा समावेश करण्याची मागणी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडे केल्याची माहिती सांगली व्हिजन सांगली फोरमचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.व्हिजन सांगली फोरमच्या वतीने पुणे रेल्वेचे सहव्यवस्थापक अजयकुमार यांना निवेदन देण्यात आले. पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात सव्वालाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. दरवर्षी दहा लाख टन द्राक्ष उत्पादन होते. तसेच दीड लाख टन बेदाणाही तयार होतो.

दिल्ली, तामिळनाडू, कोलकत्ता, जम्मू कश्मीर या राज्यांत द्राक्ष व बेदाणे पाठविले जातात. सांगली ते कोलकत्ता ट्रकने शेतीमालाची वाहतूक करण्यास ९६ तास लागतात. शिवाय दोन लाख रुपये भाडेही द्यावे लागते. किसान रेलमधून या शेतीमालाची वाहतूक झाल्यास ७० हजार रुपये भाडे होईल. शिवाय वेळेचीही बचत होणार आहे. त्यामुळे किसान रेल भाडे सवलतीच्या यादीत द्राक्ष, बेदाणाच्या समावेश करावा. त्यामुळे त्याचा लाभ सांगली, सोलापूरसह कर्नाटकमधील शेतकऱ्यांनाही होईल.रेल्वे विभागाच्या अनेक मोकळ्या जागा तशाच पडून आहेत. या जागेत क्रीडांगण, उद्याने, वेअर हाऊस विकसित करावेत. तसेच शेतीमाल निर्यातीसाठी कंटनेर व यार्डची निर्मिती करण्यात यावी. उगार रेल्वेस्थानकावर शेतीमाल उतरविण्यासाठी प्लॅटफार्म उभारावा, अशा मागण्याही रेल्वे प्रशासनाकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, राजगोंडा पाटील, सागर आर्वे, वसंत पाटील, सुभाष देशाई उपस्थित होते. 

टॅग्स :MarketबाजारSangliसांगलीrailwayरेल्वे