शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

सांगलीत घोषणांचा पाऊस

By admin | Updated: April 1, 2015 00:02 IST

महापालिका अंदाजपत्रक : ‘अच्छे दिन’चा विश्वास

शीतल पाटील - सांगली ‘हयात ले के चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ ले के चलो...’ असा संकल्प सोडत स्थायी सभापती संजय मेंढे यांनी आज, मंगळवारी महापालिकेच्या ५७३ कोटींच्या अंदाजपत्रकात अनेक नव्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला. पालिकेला अच्छे दिन येणार, असे सांगताना त्यांनी नागरिकांसाठी मोफत विमा, कर्मचारी अपघात निधी, व्हर्टिकल पार्किंग व्यवस्था, राजमाता जिजाऊ कल्याणकारी योजना, अशा अनेक उपक्रमांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. गेली दोन वर्षे एलबीटी करामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. आता हे संकट टळल्याने ‘दिल मांगे मोअर’ म्हणून ‘और जादा’ देण्याचा निर्धारही त्यांनी अंदाजपत्रकातून व्यक्त केला आहे. सभापतींनी अनेक नव्या घोषणा केल्या असल्या तरी, भविष्यात त्यांच्या पूर्ततेसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.घनकचऱ्याचा धसकाघनकचऱ्याप्रकरणी हरित न्यायालयाने पालिकेचे वाभाडे काढल्याने त्याचा धसका सत्ताधाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात घेतल्याचे दिसून आले. चिकन, मटण, फिश मार्केट, हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालयातील वेस्टेज, कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल. कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या, कंटेनर्स, डबे खरेदी केले जाणार आहेत. विस्तारित भागात रिक्षा घंटागाडीची योजना राबविली जाणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा एकत्र केल्यास दंडात्मक कारवाईची शिफारसही सभापतींनी केली आहे. नागरिकांनी आपला कचरा दुसऱ्याच्या दारात अथवा रस्त्यावर टाकून शहर विद्रुप करू नये, असे आवाहनही मेंढे यांनी केले आहे. अंदाज शायराना...स्थायी सभापती संजय मेंढे यांनी शायराना अंदाजात पालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. ‘आदमी हूॅँ आदमी से प्यार करता हूॅँ, बस यही अपराध मै हर बार करता हूॅँ’, ‘या जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, पूर्वीइतकी साखर आता गोड राहिली नाही’, ‘दरिया दरिया प्यास है तेरी, कतरा कतरा मत सोचा कर’ या त्यांच्या शायरीला सदस्यांंनीही बाके वाजवून दाद दिली.नागरिकांना मोफत विमामहापालिका क्षेत्रातील पाच ते ७० वयोगटातील नागरिकांसाठी ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील जनता व्यक्तिगत अपघात विमा योजना’ राबविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी २ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या विम्याचे हप्ते महापालिकेकडून भरले जाणार आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकास एक लाख रुपयांची मदत मिळेल. राजमाता जिजाऊ योजनाया योजनेत द्रारिद्र्य रेषेखालील कुटुंबाने एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास त्यांना प्रत्येकी दहा हजार, तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास प्रत्येकी पाच हजाराचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. ही योजना राबविणारी सांगली पालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. अंदाजपत्रकातील अन्य महत्त्वाच्या तरतुदीहार्डशीप योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एजन्सीकुपवाडमध्ये उद्यान विकासासाठी ४० लाखांची तरतूदपालिका कार्यालयात थम यंत्रासाठी २५ लाखशहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी ३० लाखअपंग व्यक्ती व महिला स्वच्छतागृहांसाठी ५० लाखनवीन आठवडा बाजारासाठी २५ लाखप्रत्येक नगरसेवकासाठी १० लाखाची तरतूदप्रभाग समितीसाठी दोन कोटीची तरतूदमुख्य रस्त्यावर कमानी उभारण्यासाठी ५० लाखथोर पुरुषांची स्मारके उभारण्यासाठी २५ लाखव्हर्टिकल पार्किंग, डिजिटल सिग्नलशहरात पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकातून केला आहे. पालिकेच्या जागांवर नवीन अद्ययावत व्हर्टिकल पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. शहरातील मुख्य रहदारीच्या चौकांत डिजिटल सिग्नल बसविण्याचा संकल्पही केला आहे.सेवक आकस्मिक दुर्घटना निधीपालिकेचे कायम कर्मचारी अनेकवेळा धोकादायक कामे करतात. अशावेळी त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आधार देण्यासाठी ‘स्थायी समिती सभापती कायम सेवक आकस्मिक दुर्घटना निधी’ची तरतूद करण्यात आली आहे.