शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

पावसाने सांगलीत दलदल, रस्ते बंद

By admin | Updated: June 8, 2014 00:43 IST

वादळी वारे : शेकडो घरांना पाण्याने वेढले, शेरीनाल्यातून फेसाळलेले सांडपाणी कृष्णेच्या पात्रात

सांगली : शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार आणि संततधार मान्सूनपूर्व पावसाने शहराची दैना उडाली. केबलसाठी रस्ते खुदाई करण्यात आल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. उपनगर व गुंठेवारी परिसरातील नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. दुचाकीवरूनच काय चालत जाण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच शंभर फुटी रोडवरील मोठ्या गटारी कचऱ्याने तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. शहर परिसरात शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. रात्रभर झालेल्या पावसाने दैना उडाली. सिव्हिल रोड, झुलेलाल चौक, सांगली हायस्कूल रस्ता, कॉलेज कॉर्नर परिसर, हरिपूर रस्ता, कोल्हापूर रस्ता, शंभर फुटी रोड आदी ठिकाणी केबलसाठी रस्त्यांची खुदाई करण्यात आली असून, खड्डे मुजवण्यासाठी मातीचा वापर झाल्याने माती रस्त्यावर पसरून रस्ते चिखलमय झाले आहेत.संजयनगर, शामरावनगरातील अनेक घरांना पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. या ठिकाणच्या विनायकनगर, आप्पासाहेब पाटीलनगरला जाणारा रस्ता बंद झाला आहे. दलदलीमुळे या नगरांना दुचाकीवरूनच काय चालत जाणेही अवघड झाले आहे. शंभर फुटी रस्त्यालगत करण्यात आलेल्या मोठ्या गटारीही कचऱ्यामुळे तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वस्त्यांमध्येही दलदल निर्माण झाली आहे. संजयनगरातील बेदमुथा प्लॉटमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. रस्तेही चिखलमय झाले आहेत. इंदिरानगरातील सांस्कृतिक भवनालाही पाण्याचा वेढा पडला आहे. येथील गटारीही तुंबल्या आहेत. खणभागमधील ड्रेनेजचे पाणी भरून वहात होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. (प्रतिनिधी)