शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:10 IST

सांगली : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज ...

ठळक मुद्देकोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन वारणा धरणात 34.16  तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज सकाळी 10.45 वाजता कोयना धरणाचे रेडियल गेट 8 फूटाने उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग 73 हजार 63 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग 3 हजार 620 क्युसेक्स इतका आहे.

यामुळे सांगली येथील सद्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याची पातळी 25 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.कोयना नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये व सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे. धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा व विसर्ग चालू आहे.

कोयना धरणात 104.72 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. कोयना धरणातून 73 हजार 63 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 95 टक्के भरले आहे. धोम धरणातून 460 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कन्हेर धरणात 9.89 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 98 टक्के भरले आहे. कन्हेर धरणातून 50 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

उरमोडी धरणात 9.90 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. उरमोडी धरणातून 450 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात 5.20 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 89 टक्के भरले आहे. वारणा धरणात 34.16 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. वारणा धरणातून 3620 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 71,नवजा 90,महाबळेश्वर 104,धोम 20,कन्हेर 12,उरमोडी 14,तारळी 2 वारणा 36.वारणा धरणात 34.16  तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठासांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.दिनांक 4 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 12.82 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.10 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3620 क्युसेक्स तर कोयना धरणातून 27 हजार 659 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 60 हजार 283 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 10 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 14 फूट 9 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).जिल्ह्यात सरासरी 2 मि. मी. पावसाची नोंदजिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज -1.6 (494.6),जत - निरंक (183.8),खानापूर-विटा - निरंक (311.6),वाळवा-इस्लामपूर -2 (668.9),तासगाव -0.3 (378.5),शिराळा - 13.8 (1721),आटपाडी - निरंक (184.1),कवठेमहांकाळ - निरंक (289.2),पलूस - 0.3 (401.8) कडेगाव - 0.6 (664.8). 

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSangliसांगली