शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागावर पावसाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:28 IST

< p >अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या ...

<p>अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या तुलनेत कमी पाऊस नोंदला गेला आहे. ग्रामीण भाग व दुष्काळी भागाला सर्वाधिक पावसाची गरज असताना त्याठिकाणी पावसाने अपेक्षाभंग केला आहे. गतवर्षी मान्सूनपूर्व पावसाने दुष्काळी भागास मोठा दिलासा दिला होता. यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, तरीही ती पुरेशी ठरली नाही. आटपाडी तालुक्याला सर्वाधिक फटका यंदाच्या पावसाळ््यात बसला. गतवर्षी ३० जुलैपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता यंदा ७९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. त्याखालोखाल जत तालुक्याची स्थिती आहे. याठिकाणी ४९ टक्के कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही गतवर्षीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. तासगावमध्ये ७ टक्के कमी, तर वाळवा तालुक्यात १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली, मिरज, तासगावचा काही भाग पावसाकरिता पोषक म्हणून ओळखले जातात. तरीही गतवर्षीच्या तुलनेत वाळवा, तासगाव या भागात कमी पाऊस झाला आहे. केवळ पलूस, शिराळा, मिरज, विटा, कडेगाव या तालुक्यातच गतवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. तुलनेत सर्वाधिक पावसाची नोंद विटा म्हणजेच खानापूर तालुक्यात झाली आहे. गतवर्षीपेक्षा ७१ टक्के अधिक पाऊस याठिकाणी नोंदला गेला. शिराळा तालुक्यात ६८ टक्के, कडेगाव तालुक्यात ६४ टक्के, मिरज तालुक्यात ६० टक्के व पलूसमध्ये ५२ टक्के गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस दिसून येत आहे. सांगली शहर व परिसरात गतवर्षीपेक्षा ५७ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा निम्म्या जिल्ह्यास लाभदायी, तर निम्म्या जिल्ह्यास अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमधील पावसाच्या भरवशावर आता यातील पाच जिल्ह्यांना रहावे लागेल. दुष्काळी भागात बºयाचदा परतीच्या पावसाची समाधानकारक हजेरी लागते. त्यामुळे परतीच्या पावसाकडेही या भागाचे लक्ष असेल.तालुकानिहाय तुलनात्मक पाऊसतालुका ३० जुलै ३० जुलै२०१७ २०१८इस्लामपूर २५७ २१५पलूस ८६.५ १६५.३तासगाव १२८ १२०सांगली परिसर १५० २५९शिराळा ३७९ ५६१मिरज १३७ २२८विटा १५९ २२५आटपाडी १७३ ३७कवठेमहांकाळ १८६ १४४जत २६९ १३९कडेगाव १९५ ३०६