शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात सुरू, 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाबाचे दर वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 12:32 IST

फुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाइन डेचा आधार मिळाला

सदानंद औंधेमिरज : व्हॅलेंटाइन डे साठी दिल्ली जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहांतील फुलांना मागणी असल्याने दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हॅलेंटाइन डे साठी हरितगृहातील फुलांची निर्यात सुरू झाली आहे. व्हॅलेंटाइन डे साठी मागणी असल्याने डच गुलाबांचा दर वधारला आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाइन डे साठी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने मिरजेतून दिल्लीला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू झाली आहे. यावर्षी डच गुलाबाचे उत्पादन कमी असल्याने जरबेरा व कार्नेशिया या फुलांची निर्यात जास्त आहे. मिरजेतून गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून दिल्लीला फुले पाठविण्यात येत आहेत.उत्तर भारतात थंड हवामान असल्याने फेब्रुवारी महिन्यास सुरुवात झाल्यानंतर दिल्लीला फुले जात आहेत. या फुलांचा दिल्लीत शीतगृहात साठा करण्यात येतो. व्हॅलेंटाइन डे साठी मागणी असल्याने एरवी पाच रुपये दर असलेल्या डच गुलाबांच्या फुलांना पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे. कार्नेशिया व जरबेरा या फुलांनाही चांगला दर मिळत आहे. मात्र, मालवाहतुकीसाठी रेल्वेच्या भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहे.मिरज रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीनशे बॉक्स गुलाब व जरबेरा फुले दिल्लीला जात आहेत. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन होत नसल्याने दिल्लीला मागणी व दर जास्त आहे. यामुळे दिल्लीला गुलाबाच्या फुलांच्या निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. व्हॅलेंटाइन डे साठी फुलांचा दर वधारला असून डच गुलाबास दहा रुपये दर मिळत आहे.मात्र, प्रत्येकी चारशे फुले असलेल्या बॉक्सला आकारमानाप्रमाणे दोनशे ते अडीचशे रुपये आकारणी करण्यात येते. दिल्लीला फुले पाठविण्यासाठी आकारमानाऐवजी प्रतिकिलो दर आकारणीची निर्यातदारांची मागणी आहे.

शेतकऱ्यांना आधारफुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाइन डेचा आधार मिळाला आहे. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेसाठी मिरजेतून दररोज तीनशे बॉक्स फुले दिल्लीला जातात. यावर्षीही डच गुलाबाला मागणी असल्याचे फुलांचे व्यापारी व निर्यातदार राजू बागणीकर यांनी सांगितले.गुलाब ३०० रुपयांवरव्हॅलेंटाइन डे मुळे स्थानिक बाजारातही गुलाबाचा दर प्रति शेकडा २०० रुपयांवरून ३०० रुपयांवर पोहचला आहे. जरबेरा व कारनेशिया या फुलांचे दरही वाढले आहेत. पुढील महिन्यात महाशिवरात्रीसाठी पांढऱ्या रंगांच्या फुलांना मागणी असल्याने निशिगंध, लिली, पांढरी शेवंती या फुलांचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे फुलांचे विक्रेते आनंद माळी यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे