शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे आरक्षण मेअखेर फुल्ल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:28 IST

उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सर्वच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे तिकीट एजंट तेजीत असून जयसिंगपूर स्थानकात

ठळक मुद्देतिकीट एजंटांच्या मध्यरात्रीपासूनच तिकीट खिडकीवर रांगा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळणे अशक्य

मिरज : उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सर्वच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे तिकीट एजंट तेजीत असून जयसिंगपूर स्थानकात तात्काळ तिकिटे आरक्षित करणाºया दोन एजंटांना पकडण्यात आले. मात्र रेल्वे सुरक्षा दलाकडून या कारवाईची नोंद झालेली नाही.

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे आरक्षण संपल्याने तात्काळ तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची दररोज रेल्वे स्थानकात गर्दी आहे. त्यामुळे तात्काळ आरक्षित तिकिटे काढून देण्यासाठी तिकीट एजंटांच्या मध्यरात्रीपासूनच तिकीट खिडकीवर रांगा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळणे अशक्य बनले आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून अधुनमधून तिकीट एजंटांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मिरज स्थानकात महिन्याभरापूर्वी तिकिटाच्या रांगेत थांबण्यावरून तिकीट एजंट व एका प्रवाशाची आरक्षण कक्षातच हाणामारी झाली होती. दोन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे तात्काळ तिकीट आरक्षित करणाºया दोन एजंटांना रेल्वे सुरक्षा दलाने पकडले. मात्र या एजंटांवर कारवाई न करता, तडजोड करण्यात आल्याची चर्चा आहे. मिरजेसह अन्य रेल्वे स्थानकात अवैध तिकीट एजंट सक्रिय असून यामुळे प्रवाशांना तात्काळ तिकिटासाठी जादा भुर्दंड पडत आहे. 

एजंटांवर कठोर कारवाईची प्रवासी संघटनांची मागणी आहे. मिरज-कोल्हापूर, मिरज-लोंढा रेल्वे मार्गावर विद्युतीकरण व दुहेरीकरणाची कामे सुरू असल्याने काही पॅसेंजर गाड्यांच्या फेºया रद्द झाल्याने एक्स्प्रेस गाड्यांना मोठी गर्दी आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचा फार्स करण्यात येत असल्याने अनधिकृत तिकीट एजंटांचे फावले आहे. 

या गाड्यांचा समावेश...मिरज-पुणे रेल्वे मार्गावर धावणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्यांचे आरक्षण जवळपास चार महिने अगोदरच फुल्ल झाले आहे, तर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या उत्तर भारतात धावणाºया यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेस, गोवा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, सुवर्णजयंती एक्स्प्रेस, संपर्कक्रांती एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचे देखील आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच दक्षिणेत धावणाºया यशवंतपूर, तिरुचिरापल्ली या एक्स्प्रेस गाड्यांचेही आरक्षण संपले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली