शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्यांमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

By admin | Updated: March 14, 2016 00:12 IST

तिकिटे संपली : प्रवाशांची धडपड; मेअखेर स्थिती कायम राहणार

सदानंद औंधे -- मिरज  --उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असल्याने, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसची मेअखेरपर्यंतची आरक्षित तिकिटे संपली आहेत. मे महिन्यात प्रवासासाठी आरक्षित रेल्वे तिकिटे मिळणे अवघड असल्याने, तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटे मिळवून देणाऱ्या एजंटांचा व्यवसाय जोमात आहे. उन्हाळी सुट्टीच्या हंगामातील रेल्वे तिकिटांचे आरक्षण मार्च महिन्यातच संपले आहे. तिकिटांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याने रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. सुट्टीच्या हंगामात लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हाच स्वस्त व सोयीचा पर्याय असल्याने रेल्वे तिकीट खिडकीवर मोठी गर्दी आहे. मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या ये- जा करतात. सुट्टीच्या हंगामात एप्रिल व मे महिन्यात रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी असते. मिरजेतून सुटणाऱ्या पुणे, बेळगाव, कुर्डूवाडी, पंढरपूर, परळी या पॅसेंजर गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोवा, दिल्ली, अजमेर, गांधीधाम, बेंगलोर, नागपूर, मुंबई, तिरुपतीला जाणाऱ्या एक्स्प्रेसची मेअखेरची आरक्षित तिकिटे संपली आहेत. आरक्षित तिकिटांची प्रतीक्षा यादी दोनशेवर पोहोचल्याने तात्काळ तिकिटांना मागणी आहे. तात्काळ तिकिटांसाठी मागणीप्रमाणे प्रिमियम दर लागू असल्याने, दुप्पट व तिप्पट दराने तात्काळ तिकिटे घ्यावी लागणार आहेत. महागड्या तात्काळ तिकिटांसाठीही प्रतीक्षा यादी असल्याने प्रवाशांची निराशा होत आहे. दिल्ली, अजमेर, गांधीधाम, एर्नाकुलम, तिरूनेलवेल्ली, चंदीगड, बेंगलोर, अहमदाबाद या नियमित व साप्ताहिक एक्स्प्रेससाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. मोठ्या प्रमाणात मागणीमुळे मे महिन्याच्या सुट्टीतील आरक्षित तिकिटे संपली आहेत. मागणीप्रमाणे दर वाढणाऱ्या प्रिमियम तात्काळ तिकिटांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली तरी, प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. गर्दी असलेल्या रेल्वे गाड्यांची तात्काळ तिकिटे एजंटांकडून मिळविण्यासाठी पाचशे ते हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. वातानुकूलित दर्जाची तात्काळ तिकिटे मिळणे तर अशक्यच झाले आहे. वातानुकूलित दर्जाच्या आरक्षित तिकिटांसाठी हजारो रूपये जादा द्यावे लागत आहेत. आरक्षित तिकिटे तीन महिने अगोदर मिळत असल्याने जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंतचे आरक्षण संपले आहे. एजंटांचा कब्जा...अनधिकृत तिकीट एजंट व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तात्काळ आरक्षित तिकीट मिळणे दुरापास्त ठरले आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठीच्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. केवळ पंधरा मिनिटात संपणारी तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी एजंटांचा स्थानकातील तिकीट खिडक्यांवर कब्जा आहे.