शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चुकीची वेळ सांगणे रेल्वेला पडले महाग

By admin | Updated: January 27, 2015 23:34 IST

पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या तरूणाने आपल्या स्वगावी येण्यासाठी आझाद हिंद एक्सप्रेसचे (२१२९) तिकीट आरक्षित केले. मात्र गाडी सुटण्याची वारंवार चौकशी केली असता सेंट्रल रेल्वे

सांगली : येथील खेराडकर गॅस एजन्सीचा परवाना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने शनिवारी निलंबित केला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे २४ हजार गॅस ग्राहकांची एकच धावपळ सुरू झाली आहे. कंपनीने या सर्व ग्राहकांना इतर एजन्सीकडे वर्ग केले असून, तेथे संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे. कंपनीच्या नियमांचे पालन न करणे, प्रतीक्षा यादी वाढणे, बँक लिंकिंगचे अत्यल्प प्रमाण आदी कारणांमुळे खेराडकर यांचा गॅस एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. येथील संजयनगरमध्ये गेल्या अठरा वर्षांपासून खेराडकर गॅस एजन्सी कार्यरत होती. या एजन्सीचे चालक मनोज खेराडकर असून, त्यांच्याकडे सांगलीसह कवलापूर, खोतवाडी, वेजेगाव, बुधगाव, बिसूर, बामणोली, कुपवाड, सोनी, भोसे, सावळी, तानंग, मालगाव, मानमोडी आदी गावांतील गॅस ग्राहक होते. यापूर्वी त्यांच्याकडे सुमारे ३५ हजार ग्राहक संख्या होती. मधल्या काळात काही गावांमध्ये नवीन गॅस एजन्सी मिळाल्याने व सांगलीतील काही ग्राहकांना इतर एजन्सीकडे वर्ग करण्यात आल्याने ही संख्या आता २४ हजारावर आली. गेल्या पंधरवड्यापासून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून खेराडकर गॅस एजन्सीची तपासणी सुुरु होती. यामध्ये खेराडकर गॅस एजन्सीचे बँक लिंकिंगचे प्रमाण केवळ ४७ टक्केच आढळून आले. इतर गॅस एजन्सीकडून ७० ते ७५ टक्के बँक लिंकिंग झाले असताना, खेराडकर गॅस एजन्सीचे लिंकिंगचे प्रमाण खूपच कमी दिसून आले. सूचना करूनही लिंकिंगचे प्रमाण वाढले नाही. त्याचबरोबर एजन्सीची प्रतीक्षा यादीही पंधरा-पंधरा दिवसांची असल्याचे दिसून आले. याबाबत वेळोवेळी सूचना करूनही त्यामध्ये सुधारणा न झाल्याने हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने २४ जानेवारीरोजी सायंकाळी खेराडकर एजन्सीचा परवाना निलंबित केला. एजन्सी निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील गॅस ग्राहक त्या-त्या भागातील एजन्सीकडे वर्ग करण्यात आले आहेत. आज सकाळी याची सूचना मिळताच खेराडकर एजन्सीसमोर मोठी गर्दी जमली होती. मनोज खेराडकरही दुकानाकडे आज फिरकले नाहीत. त्यामुळे ग्राहक संभ्रमात पडले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर गॅस ग्राहक कृती समितीच्यावतीने कोणत्या भागातील ग्राहक कोणत्या एजन्सीकडे वर्ग करण्यात आले आहेत, याची माहिती देणारे पत्रक एजन्सीसमोर लावले आहे.दरम्यान, सांगली, मिरज शहरातील एजन्सीकडे अजूनही प्रतीक्षा यादी मोठी असून, त्यांचे बँक लिंकिंगही कमी आहे. अशा एजन्सीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. गॅस नोंदणीनंतर दोन दिवसात गॅस मिळावा, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आदर्श गॅस प्रणालीची काटोकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)खेराडकर गॅस एजन्सीने कंपनीच्या नियमांचे पालन केले नाही. याबाबत वेळोवेळी त्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. बँक लिंकिंगचे प्रमाणही खूपच कमी होते. त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित केला. त्यांच्याकडील ग्राहकांना आता दुसऱ्याकडे एजन्सींकडे वर्ग करण्यात आले आहे. ग्राहकांनी आता त्यांचे सिलिंडर जमा न करता पुढील सेवा नियुक्त केलेल्या एजन्सीकडून घ्यावे. - पंकज चौधरी, वितरण अधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियमगॅस ग्राहकांच्या तक्रारीखेराडकर गॅस एजन्सीबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, अशी माहिती गॅस ग्राहक कृती समितीचे निमंत्रक सुलेमान हुक्केरी यांनी दिली. झालेली कारवाई ही उशिराची आहे. ग्राहकांंनी आता आधार कार्ड देऊन बँक लिंक करून घ्यावे, असे ते म्हणाले. एजन्सी अनेकदा वादग्रस्तखेराडकर गॅस एजन्सी अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. बोगस कनेक्शन्समुळेच बँक ल्ािंकिंगचे प्रमाण कमी झाले होते. यापूर्वीही बोगस सिलिंडरमुळे या एजन्सीवर गुन्हे दाखल झाले होते. सहा महिन्यांपूर्वी बोगस गॅस सिलिंडर विक्रीप्रकरणी एजन्सीच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एजन्सी चालकांची चौकशीही करण्यात आली होती. पुरवठा विभागाने या एजन्सीचा परवाना निलंबित करण्याची शिफारसही यापूर्वी केली होती. ग्राहक या एजन्सीकडे केले वर्ग पाटणे गॅस : धामणी, बुरुड गल्ली, वखारभाग, दक्षिण शिवाजीनगर, नेमिनाथनगर, काळे प्लॉट, खणभाग, गव्हर्न्मेंट कॉलनी, गावभाग, चांदणी चौक, मार्केट यार्ड, अहिल्यानगर, यशवंतनगर, वसंतनगर.वारणा गॅस : मार्केट यार्ड, जगदाळे प्लॉट, बालाजीनगर, खोजा कॉलनी, संजयनगर, विजयनगर, लक्ष्मीनगर, शिंदे मळा.मनोधन एजन्सी, कवलापूर : कवलापूर, कांचनपूरगणपती जिल्हा : कॉलेज कॉर्नर, माधवनगर, टिंबर एरिया, चिंतामणीनगर, उत्तर शिवाजीनगर, सांगलीवाडी, कलानगर, रामकृष्णनगर.धनराज गॅस, मिरज : मालगाव, तानंग, मानमोडी, सुभाषनगर, कुपवाड, बामणोली, कानडवाडी, सोनी, भोसे. बाळकृष्ण गॅस, जत : जत, कवठेमहांकाळव्यंकटेश, तासगाव : चिंचणी, सावर्डे, विसापूर, तासगावसिध्देश्वर, बुधगाव : बुधगाव, खोतवाडी, वेजेगाव, बिसूर