शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात छापे; मध्यप्रदेशच्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:12 IST

मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले.

सांगली : मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले. टोळीकडून पिस्तूल खरेदी करणाºया संशयितांचा शोध घेण्यात आले. या छाप्यात संशयितांचे महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. कदाचित पिस्तूलांचा आणखी साठी हाती लागण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पिस्तुलांची तस्करी करणाºया सनीदेव प्रभाकर खरात  (वय २०, रा. सिंधु-बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (२७, नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीत त्यांनी ही पिस्तुले मध्य प्रदेशमधील धामनोद या गावातून आणल्याची कबुली दिली होती. चार दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक राजन माने यांचे पथक संशयित खरात व कुंभार या दोघांना घेऊन मध्य प्रदेशला रवाना झाले होते. तेथील पोलिसांच्या मदतीने पथकाने तस्करांचा शोध घेतला. पिस्तूल तयार करणा-या कारखान्याचा मालक प्रतापसिंग भाटिया याच्यासह दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील सनीदेव खरात व संतोष कुंभार हे दोघेच मुख्य तस्कर असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही भाटियाच्या संपर्कात राहून तेथून पिस्तूल व काडतुसे आणत होती. या शस्त्रांची त्यांनी सांगली, कोल्हापूर, सातारासह अन्य जिल्ह्यात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे. शस्त्रे विकत घेणा-या काही संशयितांची नावे मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी तीन स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. या पथकांनी संशयितांच्या शोधासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले आहेत. हे संशयित हाती लागले तर आणखी पिस्तूलांचा साठा सापडण्याची शक्यता आहे. खरात व कुंभार पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक संशयित गायब झाले आहेत. त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. 

तपासाबाबत गोपनियतातपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कमालाची गोपनियता बाळगली आहे. भाटियासोबत अटक केलेल्या संशयितांचे नाव सांगण्यासही त्यांनी नकार दिला. तपास सुरु आहे, लवकरच सर्व माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हा