शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पदाधिकाऱ्याच्या व्यवसायावर सांगलीत छापे, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:28 IST

बोगस बिलांच्या संशयावरून केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई

सांगली : सांगलीतील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या व्यवसायावर गुरुवारी केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर विभागाने छापे मारून तपासणी केली. बोगस बिलांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. कारवाईबाबत गोपनीयता बाळगली असून, व्यवसायात अनियमितता आढळून आल्याचे समजते. या कारवाईची राजकीय वर्तुळात सायंकाळपासून चर्चा सुरू होती.जिल्ह्यातील या संबंधित राजकीय पदाधिकाऱ्याचा व्यवसाय आहे. सांगली मुख्य रस्त्यावर या पदाधिकाऱ्याचे व्यवसायाचे ठिकाण आहे. या व्यवसायातून बोगस बिले दाखवून उलाढाल दाखविल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाला मिळाली होती.कोल्हापूर येथील गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी सांगलीत येऊन या पदाधिकाऱ्याच्या व्यवसायाची चौकशी सुरू केली. उशिरापर्यंत झालेल्या तपासणीत कोट्यवधींची उलाढाल बोगस बिलांच्या माध्यमातून करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.राजकीय पदाधिकाऱ्याच्या सांगलीतील कार्यालयावर आणि निवासस्थानी केंद्रीय जीएसटी विभागाने छापे मारल्याच्या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. केंद्रीय जीएसटी विभागाने याबाबत कोणतीही अधिक माहिती दिली नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत हा राजकीय पदाधिकारी कोण? त्याचा व्यवसाय कोणता? याची अनेकजण एकमेकांना विचारणा करत होते.