इस्लामपूर : घर, जागा, नागरिकत्व आणि हाताला काम मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर दलित महासंघाच्या माध्यमातून अधिवाशी पारधी हक्क अभियानाचे राहुटी आंदोलन सुरू होते. गुरुवारी प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रा. मधुकर वायदंडे यांनी दिली.
वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी हे आंदोलन सुरू होते. गुरुवारी प्रांताधिकारी पाटील यांनी आंदोलकांची चर्चा करून २२ फेब्रुवारी रोजी वाळवा-शिराळा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पारधी पुनर्वसनासाठी ठोस अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा वायदंडे यांनी दिला. यावेळी नायब तहसीलदार सुनील चव्हाण, अव्वल कारकून महादेव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते, सुधाकर वायदंडे, दिनकर नांगरे, राज लोखंडे, विकी घाटे, टारझन पवार, कारकून पवार, जितेंद्र काळे, रोशना पवार उपस्थित होत्या.
फोटो - ११०२२०२१-आयएसएलएम-पारधी आंदोलन न्यूज
इस्लामपूर येथे दलित महासंघाच्या अधिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने प्रांताधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. मधुकर वायदंडे, सुधाकर वायदंडे, जितेंद्र काळे, रोशना पवार उपस्थित होत्या.