शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कलेला दाद; चिमणीचं घरटं तारेचं..पाच हजाराच्या मोलाचं, सांगलीतील प्रदर्शनातून आलं अर्थभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 13:18 IST

सांगली : काट्याकुट्यांनी चिमणी (सुगरण) तिचं घरटं साकारते. तिच्या कलेचे कौतुक मानवाला नेहमीच वाटत आले आहे. सांगलीच्या कलाकाराने याच ...

सांगली : काट्याकुट्यांनी चिमणी (सुगरण) तिचं घरटं साकारते. तिच्या कलेचे कौतुक मानवाला नेहमीच वाटत आले आहे. सांगलीच्या कलाकाराने याच चिमणीच्या घरट्याला चक्क तारांच्या सहाय्याने साकारले. कलारसिकांनी त्याचे कौतुकच तर केलेच पण, पाच हजार रुपयांमध्ये घरटे खरेदी करुन त्याच्या कलेचा सन्मानही केला.निसर्गाच्या जवळ जाते ती कला प्रत्येकाला भावतेच, पण यासोबत ती बरेच काही देऊनही जाते. राहूल बाबर याने तारेपासून तयार केलेले घरटे तब्बल पाच हजार रुपयाला विकले गेले.कलाविश्व महाविद्यालयामध्ये विविध वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तयार केलेल्या चित्र आणि शिल्पांमधून अगदी निवडक कलाकृतींचे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात आले होते. राहूल शहाजी बाबर हा इंटरमिजिएट शिल्पकलेचा विद्यार्थी. सांगोला तालूक्यातील चोपडी गावचा राहूल शिक्षणासाठी सांगलीत आला. शिल्पकलेत काही वेगळे काम करण्याचा प्रयत्न करीत राहिला. घरटे पुर्ण करायला लागले पंधरा दिवस

या प्रदर्शनात त्याने तारेपासून तयार केलेले चिमणीचे घरटे सादर केले. ते पूर्ण करायला त्याला पंधरा दिवस लागले. जवळपास अडीच फुटाचे हे तारेपासून तयार केलेले अप्रतिम घरटे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी पाच हजार रुपयाला विकत घेतले आणि कलेतून करियरसोबत कमाईसुध्दा करता येते याचा अनुभव राहूल याला आला.

टॅग्स :Sangliसांगली