शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र

By अशोक डोंबाळे | Updated: August 4, 2023 19:05 IST

इस्लामपुरात ९ ऑगस्टला चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा

सांगली : ऊस, दूध आणि शेतमालाच्या भावात पिळवणूक होत असल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट वाढले आहे. ‘इंडिया’विरुद्ध ‘भारत’ ही लढाई मागील ७० वर्षांपासून सुरू असली तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचा पराभव झाला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सरकार हाकलले तरच शेतकरी वाचतील, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. इस्लामपूर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आपकी बार किसान सरकार आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, २०१३ मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इतर राज्यांप्रमाणे तेलंगणा राज्यातही शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के. चंद्रशेखर राव यांनी धोरण राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शेतीला पाणी, मोफत वीज देण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी १० हजार रुपये थेट रोख मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. परिणामी, तेलंगणा राज्यावरील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला गेला. मराठवाड्याचे माजी महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या अहवालात सुमारे एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासले असल्याचे नमूद केले. त्यांनी तेलंगणा सरकारप्रमाणे एकरी १० हजार रुपये मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र, सरकारने ही शिफारस धुडकावून लावली आहे. शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

मागील ७५ वर्षांत आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी इस्लामपुरात ९ ऑगस्ट रोजी चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी बी. जी. पाटील, महिला संघटनेच्या वंदना माळी, शर्वरी पवार उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार