शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत घरात घुसून तलवारीच्या धाकाने सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला; मदतीसाठी आलेल्या तरुणावर दगडाने हल्ला

By शरद जाधव | Updated: October 23, 2022 20:47 IST

रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

सांगली: शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात घराचा मुख्य दरवाजा उचकटून आत प्रवेश करत महिलेस तलवार, कटावणी व चाकूचा धाक दाखवून दोन लाख २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात अला. याप्रकरणी दिप्ती प्रकाश माळी (रा. शर्वम बंगला, माळी कॉलनी, औद्याेगिक वसाहत, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेडिकल व्यवसायिक असलेल्या फिर्यादी माळी या माळी कॉलनीमध्ये कुटूंबियांसह राहण्यास आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास माळी कुटूंबिय झोपले असताना, चार संशयितांनी घराच्या गेटची कडी तोडून, घणाचा मुख्य दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमच्या दरवाजावरती लाथा मारुन त्यांनी कडी तोडून आत प्रवेश केला. त्याठिकाणी झाेपलेल्या माळी यांना चौघांनी तलवार, कटावणी व चाकूचा धाक दाखवला व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या. चोरी करुन चोरटे बाहेर जात असतानाच, दिप्ती माळी यांचा भाऊ राजाराम माळी हे आवाज ऐकून मदतीसाठी आले. चोरट्यांनी त्यांनाही दगड मारुन जखमी करत तेथून पोबारा केला.घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे. ऐन दिवाळीत आणि घरात घुसून ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.सव्वा दोन लाखांवर डल्लाचोरट्यांनी फिर्यादी दीप्ती माळी यांच्या दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या, २८ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व ५०० रुपयांची रोकड चोरुन नेली आहे. 

टॅग्स :RobberyचोरीSangliसांगलीPoliceपोलिस