शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

आर. आर.-सगरे गटाचेच वर्चस्व

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

महांकाली कारखाना निवडणूक : संपूर्ण पॅनल विजयी; संजय पाटील गटाचे पानिपत

कवठेमहांकाळ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुती नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडवीत राष्ट्रवादीच्या पॅनलने मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व पंधरा जागांवर विजय मिळविला. आबा-सगरे गटाच्या महांकाली शेतकरी विकास पॅनलने खासदार संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, जयसिंगराव शेंडगे यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनलला विधानसभेपूर्वीच धक्का दिला आहे. निकालानंतर आबा-सगरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. विजयी उमेदवारांना पाच हजाराचे मताधिक्य मिळाले, तर विरोधी गटाला १२00 पेक्षा अधिक मते मिळविता आली नाहीत. निवडणुकीत एकूण अकरा हजार तीनशे तेरा सभासदांपैकी सात हजार आठशे तेवीस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. रविवारी सकाळी आठ वाजता कारखान्याच्या साखर गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी महेश कदम यांनी निकाल जाहीर केला. आबा-सगरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. शहरातून घोषणाबाजी करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. कारखान्याच्या कार्यस्थळावर गृहमंत्री आर. आर. पाटील दाखल होताच शेकडो कार्यकर्त्यांनी आर. आर. पाटील, विजय सगरे व युवा नेते गणपती सगरे यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला व शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढली.घोरपडे गटाला धक्कामहांकाली पॅनेलच्या विजयाने आबा-सगरे गटाचे कार्यकर्ते एकीकडे रिचार्ज झाले आहेत; तर अजितराव घोरपडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभेची ही रंगीत तालीम म्हणून दोन्ही पॅनेल लढत होते. तिन्ही नेते अपयशीकारखाना निवडणुकीत खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे व जगसिंगराव शेंडगे या तिन्ही नेत्यांची ताकद एकवटली होती. तरीही त्यांना पॅनेलमधील एकाही सदस्याला निवडून आणता आले नाही. त्यामुळे या निकालातून त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.