शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

आर. आर. आबांच्या लाेकाभिमुख वारशावर कर्तृत्वाची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:20 IST

आबा कुटुंबीयांच्या बाजूने लागलेला प्रत्येक निकाल हा राजकीय विरोधकांकडून सहानुभूतीचा वारसा म्हणून हिणवला जात होता.

दत्ता पाटीलतासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांवर आकस्मिक राजकीय जबाबदारी पडली. आबा कुटुंबीयांच्या बाजूने लागलेला प्रत्येक निकाल हा राजकीय विरोधकांकडून सहानुभूतीचा वारसा म्हणून हिणवला जात होता.मात्र, कवठेमहांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवल्याने त्याचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वाची मोहोर उमटली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचा मार्ग सुकर झाला असून आबांचा राजकीय वारस राजकारणातही सरस ठरल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले आहे.आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव बाजार समिती, तासगाव नगरपालिका, कवठेमहांकाळ नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि तासगाव, कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. अपवादवगळता सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले होते.मात्र, हे यश वारसदारांचे नसून आबांच्या सहानुभूतीचे असल्याची टीका होत राहिली. यावेळी झालेली कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणुकीची धुरा पहिल्यांदाच आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. रोहित पाटलांच्या नेतृत्वाखाली पहिलीच निवडणूक होत असल्याचे तासगाव-कवठेमहांकाळसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे केंद्रीत झाले होते.निवडणुकीत रोहित पाटलांच्या पॅनेलची एकहाती सत्ता आली. एकीकडे सगळे दिग्गज विरोधात असताना रोहित पाटलांनी नगरपंचायतीची सत्ता मिळवून आबांच्या केवळ घराण्याचाच वारसा नसून राजकीय कर्तृत्वाचा वारसाही मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाने रोहितच्या राजकीय कर्तृत्वावर यशस्वी मोहोर उमटली आहे.परिणामी रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकांसाठीही राष्ट्रवादी सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळत असून कवठेमहांकाळच्या विजयाने रोहितची आगामी वाटचाल सुकर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मातब्बरांचे एकीकरणानंतरही पानिपत

कवठेमहांकाळची निवडणूक लक्षवेधी होण्यासाठी आणखी एक कारण होते. रोहित पाटलांच्या विरोधात खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, सगरे गटाच्या अनिता सगरे,  गजानन कोठावळे असे अनेक मातब्बर एकत्रित आले होते. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने लक्षवेधी झाली होती. मात्र, या निवडणुकीत या सर्व मातब्बरांचे पानिपत झाले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारणNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२