शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उठावसाठी साडेअकरा कोटींची वाहन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:24 IST

Muncipal Corporation Sangli - सांगली महापालिका क्षेत्रात कचरा उठावसाठी ११ कोटी ४० लाख रुपयांच्या वाहन खरेदीला बुधवारी ऑनलाईन महासभेत मान्यता देण्यात आली. घनकचरा प्रकल्प प्रलंबित असताना वाहन खरेदी कशासाठी, असा आक्षेप काही नगरसेवकांनी घेतला.

ठळक मुद्देसांगली महापालिका महासभेची मान्यता जीईएम पोर्टलवरून खरेदीचा ठराव

सांगली : महापालिका क्षेत्रात कचरा उठावसाठी ११ कोटी ४० लाख रुपयांच्या वाहन खरेदीला बुधवारी ऑनलाईन महासभेत मान्यता देण्यात आली. घनकचरा प्रकल्प प्रलंबित असताना वाहन खरेदी कशासाठी, असा आक्षेप काही नगरसेवकांनी घेतला. यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी, घनकचरा प्रकल्प निविदा व वाहन खरेदी हे दोन्ही वेगळे विषय आहेत, असे स्पष्ट केले. महापौर गीता सुतार यांनी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून वाहन खरेदीचे आदेश प्रशासनाला दिले.घनकचरा व्यवस्थापनासाठी १४ व्या वित्त आयोगातून ११ कोटी ४० लाख ७८८ रुपयांची विविध प्रकारची वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यावर महासभेत चर्चा झाली. उपमहापौर आनंदा देवमाने, करीम मेस्त्री, वहिदा नायकवडी, स्वाती शिंदे, शेखर इनामदार यांनी शहरातील घनकचरा गोळा करण्यासाठी वाहन खरेदी महत्त्वाची आणि गरजेची असल्याचे सांगितले. गजानन मगदूम म्हणाले की, स्थायी समितीने घनकचरा प्रकल्प निविदा प्रक्रिया रद्दच्या ठराव केला असताना, वाहन खरेदी कशासाठी?यावर आयुक्त कापडणीस म्हणाले की, निविदा प्रक्रिया रद्दचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. त्याचा आणि वाहने खरेदीचा काही संबंध नाही. दोन्ही वेगळे विषय आहेत. वाहने खरेदी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे. त्यातील ३२ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयोगाची मुदत संपली असली, तरी निधी खर्च करण्याला कालमर्यादा नाही. त्यासाठी मनुष्यबळ कसे भरती करणार, वाहनांच्या दुरुस्तीसाठी वर्कशॉप कुठे आहे, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वापरता येतो का, असे प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले.माजी सैनिकांना मालमत्ता करात सूटसभेत शासन आदेशाप्रमाणे माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मालमत्ता कर म्हणजे केवळ २२ टक्के सामान्य कर वगळला जातो. इतर कर तसेच असतात. त्यामुळे एकूणच सूट द्यावी, अशी मागणी ॲड. स्वाती शिंदे यांनी केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली