शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील हल्ल्याचा 'भाकप'तर्फे सांगलीत निषेध; सरोदे, चौधरी, वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By अशोक डोंबाळे | Updated: February 10, 2024 19:19 IST

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश देशमुख यांनी केली.

सांगली: पुणे येथे 'निर्भय बनो' असे जनतेला आवाहन करणाऱ्या सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन करून जीवघेणा हल्ला केला. या फॅसिस्ट हिंस्र हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कार्यकारिणीतर्फे तीव्र निषेध करत आहे. तसेच याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश देशमुख यांनी केली.

उमेश देशमुख म्हणाले, भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्राचे प्रशासन आणि पोलिस खात्याला उघड आव्हान दिले होते. 

लोकशाही अधिकार बजावणाऱ्या नागरिकांना निर्भयतेने आपले कर्तव्य पार पाडण्यास संविधानाचे कवच पुरवले पाहिजे. या बाबतीत प्रशासन आणि पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ कामचुकारपणा केलेला नाही तर या खुनी हल्ल्यास आपल्या वर्तनाने साह्य केले आहे. या तिघांवर ठिकठिकाणी हल्ले करायचे नियोजन भाजपच्या गुंडांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबतीत पोलिसांची भूमिका उघडपणे पक्षपाती होती, हेही दिसून आले आहे. राज्यातील जनतेला निर्भयपणे आपले लोकशाही व्यवहार पाळता यावेत, याची अंतिम जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडायच्या ऐवजी गाडीखालील श्वानाचा दाखला देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांची पाठराखण केली आहे. राज्यातील गोळीबारांच्या घटनांच्या पाठोपाठ पुण्यातील हल्ला हे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे लक्षण तर आहेच. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या भाजपाच्या आशीर्वादाने होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागण्या

  • -खुनाचा आणि सामाजिक अशांतता पसरवण्याचा कट करून तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा
  • -कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि गुन्हेगारांना साथ देणाऱ्या पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा
  • -गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे.
टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस