शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पलूस कॉलनीत रंगला अनोखा स्नेहमेळावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:09 IST

येथील पलूस कॉलनीतील आजी-माजी रहिवाशांनी एकत्र येत अनोखा स्नेहमेळावा साजरा केला. यानिमित्ताने अनेकांनी बालपणीच्या, उमेदीच्या काळातील स्मृतींना यावेळी

ठळक मुद्देपलूस कॉलनीला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा स्नेहमेळावाबरोबर १०० कुटुंबांचे हे गाव.

पलूस : येथील पलूस कॉलनीतील आजी-माजी रहिवाशांनी एकत्र येत अनोखा स्नेहमेळावा साजरा केला. यानिमित्ताने अनेकांनी बालपणीच्या, उमेदीच्या काळातील स्मृतींना यावेळी उजाळा दिला.

पलूस कॉलनी हे गाव १९६४ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या सेवक वर्गासाठी महाराष्ट्र हौसिंग बोर्डाच्या सहकार्याने वसवले गेले. बरोबर १०० कुटुंबांचे हे गाव. पुढे येथील अनेक कुटुंबे शिक्षण, नोकरी, निवृत्ती अशा विविध कारणांनी कॉलनीतून बाहेर पडली. परंतु सर्वांची नाळ कायमच पलूस कॅलनीशी जोडलेली राहिली. कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब गोडबोले यांचे ६ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले. गोडबोले यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने तसेच पलूस कॉलनीला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी गणेश मंदिरानजीक मंडप उभारण्यात आला होता. अगदी कमी वेळात, पण कल्पनाशक्ती पणाला लावून माहेरवाशिणींनी उत्तम कार्यक्रम सादर केले. स्त्रीजीवनाच्या विविध टप्प्यांवर आधारित अशी गीते एका सूत्रात गुंफून काव्यरुपी कथाही सादर केली. सर्व स्त्रियांनी हादगाही घातला. लगोरी, क्रिकेट, डॉजबॉल अशा मैदानी खेळांनी पटांगणही गाजवले.

रात्री विविध गुणदर्शन कार्यक्रमात गाणी, अभंग, भारुड तर झालेच, पण मंगळागौरीच्या खेळांमधले कौशल्यही सर्व प्रेक्षकांना दाखवले. बाळासाहेब गोडबोले यांना ‘स्वर श्रध्दांजली’ म्हणून सांगीतिक मैफल सादर करण्यात आली.वृक्षारोपणातून आठवणवय वर्षे ४ ते ८० पर्यंतच्या हौशी कलाकारांनी गायन, वादन, नृत्य, भारूड, कवन, नाट्य अशा विविध कलांचे सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. आकाशदिवे आसमंतात सोडून कार्यक्रमाची सांगता झाली. दुसऱ्यादिवशी या सोहळ्याची आठवण म्हणून ज्येष्ठ नागरीक रंगनाथ पेहेकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थी