शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘मिले कदम, जुडे वतन’चे राहुल गांधींच्या हस्ते प्रकाशन, पृथ्वीराज पाटलांची संकल्पनेचे केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:33 IST

राहुल गांधी यांनी या संपूर्ण दौऱ्यात स्वीकारलेल्या निवडक सत्कारात व कार्यक्रमात या कॉफी टेबल बुकचा समावेश केला.

सांगली : शेगाव येथे झालेल्या भारत जोडो यात्रेच्या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी साकारलेल्या ‘मिले कदम, जुडे वतन’ या भारत जोडो यात्रेतील कन्याकुमारी ते हिंगोली प्रवास चित्रबद्ध करणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केले.यावेळी संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशसिंह बघेल, खासदार मुकुल वासनिक, खासदार जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम व सतेज पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते.राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा ऐतिहासिक घटना असून, त्याचे विविध प्रकारे दस्तावजीकरण झाले पाहिजे, या भावनेतून पृथ्वीराज पाटील यांनी हे कॉफीटेबल बुक साकार केले आहे. यामध्ये कन्याकुमारी ते हिंगोली यात्रेतील निवडक क्षणचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये राहुल गांधी यांची भावनिक, विविध समूहांबरोबरची, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाची छायाचित्रे आदींचा समावेश आहे. त्यांना साजेसे ऐतिहासिक उद्गार, राष्ट्रपुरुषांची प्रसिद्ध वाक्ये यात आहेत.पृथ्वीराज पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचे काँग्रेस च्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी स्वागत केले. स्वतः राहुल गांधी यांनी जवळपास पाच मिनिटे विशेष वेळ देऊन हे कॉफी टेबल बुक नजरेखालून घातले. राहुल गांधी यांनी या संपूर्ण दौऱ्यात स्वीकारलेल्या निवडक सत्कारात व कार्यक्रमात या कॉफी टेबल बुकचा समावेश केला. काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील हे कॉफी टेबल बुक हे भारत जोडो यात्रेच्या इतिहासाची नोंद करणारा महत्त्वाचा दस्त ऐवज आहे, अशी भूमिका मांडली.

टॅग्स :SangliसांगलीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी