शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : युतीच्या कारभारास जनता कंटाळली : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:50 IST

: कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराला जनता कंटाळली असून, राज्यात महाआघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देयुतीच्या कारभारास जनता कंटाळली : बाळासाहेब थोरातवांगी (ता. कडेगाव) येथे कॉँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम प्रचार सभा

वांगी : कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराला जनता कंटाळली असून, राज्यात महाआघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.वांगी (ता. कडेगाव) येथे कॉँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार मोहनराव कदम, विश्वजित कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, सुरेश मोहिते, मालन मोहिते आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले की, पतंगराव कदम मतदार संघालाच नव्हे, तर महाराष्ट्राला लाभलेले वरदान होते. शिक्षण आणि रोजगार निर्मितीत त्यांचे कार्य उत्तुंग होते. त्यांचे सुपुत्र विश्वजित यांनीही वडिलांच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी मतदार संघात केली आहे.सचिन सावंत म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. यावेळी राज्यावर २ लाख ४० हजार कोटींचे कर्ज होते. त्यानंतर या पाच वर्षांत हे कर्ज पाच लाख कोटींवर गेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या सरकारमधील २१ मंत्र्यांचे घोटाळे समोर आले; परंतु कारवाई झाली नाही. याउलट सरकारविरोधी बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखविली जात आहे. सरकारला त्यांची जागा दाखवा.विक्रमी मताधिक्याने विजय व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा, असे विश्वजित कदम यांनी सांगितले. यावेळी ए. डी. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सखाराम सूर्यवंशी, मारुती चव्हाण, जयसिंग कदम, विठ्ठल मुळीक, दिलीप सूर्यवंशी, हिम्मत देशमुख, सुरेश घार्गे, राजकुवर सूर्यवंशी, शोभाताई मोहिते, नयना शिंदे, गीतांजली पवार, धनाजी सूर्यवंशी, सुनील जगदाळे, अविनाश येवले उपस्थित होते. सरपंच विजय होनमाने यांनी स्वागत केले. बाबासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली