शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संख येथे जप्त वाळूचा 17 मार्चला जाहीर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:07 IST

Sand Sangli Sankh- पर तहसिल कार्यालय संख येथे वाळूचा जाहीर लिलाव दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता अपर तहसिल कार्यालय संख ईरीगेशन कॉलनी संख येथे बोली पध्दतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जत प्रशांत आवटे यांनी दिली.

ठळक मुद्देसंख येथे जप्त वाळूचा 17 मार्चला जाहीर लिलावसंखच्या आवारात 25, पोलीस ठाणे उमदीच्या आवारात 5 ब्रास असा एकूण 30 ब्रास वाळू साठा

सांगली : अपर तहसिल कार्यालय संख येथे अनाधिकृत वाळू वाहतुकीवर कारवाई करताना आढळलेल्या वाहनामधील अनाधिकृत वाळू जप्त करून अपर तहसिल कार्यालय संखच्या आवारात 25 ब्रास व पोलीस ठाणे उमदी च्या आवारात 5 ब्रास वाळू साठा असा एकूण 30 ब्रास वाळू साठा ठेवण्यात आलेला आहे. या वाळूचा जाहीर लिलाव दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता अपर तहसिल कार्यालय संख ईरीगेशन कॉलनी संख येथे बोली पध्दतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जत प्रशांत आवटे यांनी दिली.जप्त केलेल्या वाळु साठ्याचा लिलाव करण्यासाठी हातची मुळ किंमत (अपसेट प्राईज) 5 हजार 729 रूपये प्रति ब्रास प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता हातच्या मुळ किंमतीच्या 20 टक्के अनामत रक्कम म्हणजेच अर्जदार यांनी अपर तहसिल कार्यालय संख च्या आवारातील 25 ब्रास वाळू साठा लिलावात भाग घेण्याकरिता 28 हजार 645 रूपये एवढी अनामत रक्कम व उमदी पोलीस ठाण्याच्या आवारातील 5 ब्रास वाळू साठा लिलावात भाग घेण्याकरिता 5 हजार 729 एवढ्या अनामत रक्कमेचा धनादेश लिलाव प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जमा करावयाचा आहे.वाळू लिलावाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. वाळूची निश्चित करण्यात आलेल्या अपसेट किंमतीपेक्षा अधिक बोलीने लिलावास सुरूवात करण्यात येईल. लिलावाने द्यावयाची वाळू दर्शविले ठिकाणी आहे अगर कसे याची खात्री करून घेण्याची जबाबदारी संबंधित लिलावधारकाची राहील. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या लिलाव धारकाने महत्तम बोली पैकी ळ् रक्कम त्याच दिवशी शासकीय कोषागारात भरण्याची आहे. उर्वरित रक्कम तीन दिवसाच्या आत भरण्याची आहे.

लिलावात महत्तम बोलीची संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर वाळूचा ताबा देण्यात येईल. लिलावातील वाळू उचलण्यासाठी वाहनाचा खर्च लिलावधारकांनी स्वत: करण्याचा आहे. लिलाव धारकाने वाळू लिलावाच्या एकूण रक्कमेच्या 10 टक्के जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी सांगली यांच्या खाती भरणे बंधनकारक असल्याचे जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी कळविले आहे.

टॅग्स :sandवाळूSangliसांगली