शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची सोय करा; जनता दलाची मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: May 18, 2024 18:17 IST

जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

सांगली : जिल्ह्यात प्रचंड पाणीटंचाई असून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पशुधनासाठी चारा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू ठेवून पाझर तलाव भरून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मान्सूनचा पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे चारा, पाण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तसेच ताकारी, टेंभू, म्हैसाळ जलसिंचन योजनेतून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जलसाठे भरून घ्यावेत, तसेच गरज असेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा. वीजबिलात केलेली भरमसाठ वाढ तत्काळ मागे घेण्याची गरज आहे. महावितरणने सक्तीची अनामत रक्कम रद्द करावी, आदी मागण्यांचे निवेदन जनता दलाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.यावेळी प्रणव पाटील, सुमित पाटील, जयपाल चौगुले, जनार्दन गोंधळी, विजय कुदळे, साहेबुद्दीन मुजावर आदी उपस्थित होते.चारा डेपो, चारा छावण्या सुरू कराअपुऱ्या पावसामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रशासनाने तातडीने चारा डेपो, चारा छावण्या सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. मनरेगाच्या कामातून जनतेला रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रणव पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळ