इस्लामपूर येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, कमल पाटील, नयना पाटील, मंजूषा पाटील उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांगली जिल्हा व वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल दरवाढीच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रदेश सदस्या कमल पाटील, तालुका कार्याध्यक्षा सुनीता देशमाने, खजिनदार नयना पाटील, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनी नेतृत्व केले.
येथील राष्ट्रवादी भवनसमोर गॅस सिलिंडरचे पूजन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मंजूषा पाटील, जयश्री पवार, रेखाताई कोळेकर, विद्याताई भानुसे (इटकरे) ज्योती पाटील (सुरुल), शारदा माळी, ज्योती तांदळे, नीता पाटील, रंजना पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
सुस्मिता जाधव म्हणाल्या, केंद्र सरकार सातत्याने गॅस, पेट्रोल, डिझेल व खाद्य तेलाच्या किमती वाढवून देशातील जनतेचे जगणे मुश्कील करीत आहे. केंद्राने वाजत-गाजत सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेतून दिलेली सिलिंडर धूळ खात पडली आहेत. आमच्या भगिनी पुन्हा एकदा चुलीच्या धुरात स्वयंपाक करीत आहेत. त्या मोदी सरकारला माफ करणार नाहीत.
यावेळी कमल पाटील, सुनीता देशमाने, नयना पाटील, प्रियांका साळुंखे यांनीही केंद्र सरकारचे वाभाडे काढले.