शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील कारवाईबद्दल सांगलीत माकपच्यावतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:49 IST

माकपचे नेते सीताराम येचुरी, अर्थशास्त्र अभ्यासक जयंती घोष यांच्यासह अनेकांवर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवल्याबद्दल निषेध करीत माकपतर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देसांगलीत माकपच्यावतीने निदर्शने, केंद्र सरकारचा निषेध दिल्लीतील कारवाईबद्दल संताप

सांगली : माकपचे नेते सीताराम येचुरी, अर्थशास्त्र अभ्यासक जयंती घोष यांच्यासह अनेकांवर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवल्याबद्दल निषेध करीत माकपतर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली.सांगलीच्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार मुर्दाबाद, धर्मनिरपेक्ष जिंदाबाद, मोदी-शहा मुर्दाबाद, दिल्ली दंगलीचे दोषी कोण?, संघ-भाजप आणखी कोण! अशा घोषणा देत माकप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी उमेश देशमुख म्हणाले की, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, जयंती घोष, स्वराज्य अभियानाचे अपूर्वानंद, माहितीपटाचे दिग्दर्शक राहुल रॉय यांच्यावर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

दिल्ली पोलिसांची व केंद्र शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह व हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, व गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करीत आहोत.

येचुरी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. गुन्हे मागे न घेतल्यास आम्ही पुन्हा याबाबत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात देशमुख यांच्यासह दिगंबर कांबळे, नितीन पाटील, संजय कांबळे, रियाज जमादार, किशोर केदारी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली