शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सांगलीत जनता दलातर्फे निषेध दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 14:38 IST

जनता दल (सेक्युलर)च्यावतीने गुरुवारी सांगलीत आणीबाणी निषेध दिनानिमित्त निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना जयंतीनिमितत्त अभिवादनही करण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीत जनता दलातर्फे निषेध दिनधरणे आंदोलन : व्ही. पी. सिंगना अभिवादन

सांगली : जनता दल (सेक्युलर)च्यावतीने गुरुवारी सांगलीत आणीबाणी निषेध दिनानिमित्त निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना जयंतीनिमितत्त अभिवादनही करण्यात आले.जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ््यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की, २५ जून १९७५ रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते.

वृत्तपत्र स्वातंत्र्यावर निर्बंध लादून त्यांची गळचेपी केली. आणीबाणीचा काळ देशाच्या इतिहासातील काळेकुट्ट पर्व ठरले. लोकशाहीचा मुडदा पाडला गेला. याचा निषेध म्हणून जनता दलाच्यावतीने आणीबाणी निषेध दिन पाळण्यात आला.त्याचबरोबर २५ जून हा भारताचे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा जन्मदिन आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी मंडल आयोग लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यामुळे देशातील बहुजन, ओ.बी.सी.ना न्याय मिळाला व त्यांचा विकास आणि प्रगतीचे नवे पर्व सुरू झाले. त्यामुळे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमही घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. आंदोलनात जनता दलाचे अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. फैय्याज झारी, डॉ. जयपाल माळी, राजेंद्र कोलप, शशिकांत गायकवाड आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीJanta Dal Unitedजनता दल युनायटेड