शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:32 IST

सांगली जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने एमएचटी-सीईटी परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे. केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात 144 लागू केले आहे.

ठळक मुद्देएमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारीएकत्रित गटागटाने फिरणे, उभा राहण्यास मनाई

सांगली : सांगली जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रावर 1 ते 9 ऑक्टोबर 2020 व दि. 12 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एमएचटी-सीईटी परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात परीक्षेच्या दिनांकास 7.00 वाजल्यापासून ते 20.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.या आदेशानुसार वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.

या वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.परीक्षा केंद्राचे नाव पुढीलप्रमाणे.

राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजाराम नगर साखराळे इस्लामपूर ता. वाळवा, आदर्श इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खंबाळे (भा.) एमआयडीसी खानापूर-विटा, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीक्लिनिक विंग सांगली-तासगाव रोड बुधगाव ता. मिरज, आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी आष्टा, ता. वाळवा, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली-तासगाव रोड बुधगाव ता. मिरज.

या परीक्षा केंद्रावर दिनांक 1 ते 09 ऑक्टोबर 2020  व दि. 12 ते 20 ऑक्टोबर 2020 या दिनांकास प्रथम सत्र सकाळी 7.30 ते 12.00 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते 6.45 या वेळेत होणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाSangliसांगली