इस्लामपूर : सीमाभागातील येळ्ळूर येथील मराठी बांधवांना कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा येथील अखिल भारतीय मराठा सेवा संघ, शंभुराजे युवा क्रांती, जिजाऊ महिला क्रांती संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. तहसीलदार रूपाली सरनोबत यांना हे कर्नाटक शासनाच्या व पोलिसांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य’ हा फलक कर्नाटक शासनाने कायदा हातात घेऊन काढून टाकताना मराठी बांधव, महिला, मुले व वृध्दांना केलेली मारहाण, हा मराठी अस्मितेवर घाला आहे. सीमाप्रश्नाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना हा झालेला अत्याचार अमानवी आहे. कर्नाटक शासनाने हा अन्याय असाच सुरू ठेवल्यास महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेस अडविल्या जातील, असे उमेश कुरळपकर, अभिजित पाटील यांनी म्हटले आहे.यावेळी पवनकुमार लाड, साकेत कांबळे, प्रवीण कुरळपकर, प्रसाद तिरमारे, तुषार पाटील, डॉ. अमित पाटील, विश्वजित पवार, सुधीर सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)मुळातच सीमाप्रश्नाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य’ हा फलक कर्नाटक शासनाने काढून टाकताना मराठी बांधव, महिला, मुले व वृध्दांना मारहाण केली. हा अत्याचार अमानवी आहे. कर्नाटक शासनाने हा अन्याय असाच सुरू ठेवल्यास महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेस अडविल्या जातील, असा इशारा मराठा सेवा संघ, शंभुराजे युवा क्रांती, जिजाऊ महिला क्रांती संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्नाटक शासनाचा इस्लामपुरात निषेध
By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST