शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे काम 'प्रागतिक पक्ष आघाडी' करेल - बाबासो देवकर 

By अशोक डोंबाळे | Updated: August 21, 2023 14:33 IST

आघाडीची सांगलीत झाली बैठक, जिल्ह्याच्या समन्वयकपदी दिगंबर कांबळे

सांगली : राज्यामध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कामगार कर्मचारी आणि महिला, विद्यार्थी, युवकांच्या प्रश्नावर राज्यभर आवाज उठविण्यात येणार आहे. या सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्यातील सत्तेच्या बाजाराला फाटा देऊन परिवर्तन घडविण्याची लढाई सुरु करायची आहे. या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रागतिक पक्ष आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक बाबासो देवकर यांनी केले. तसेच राज्यात १३ विभागीय मेळावेही घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्यूलर), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन, आर. पी. आय. (सेक्यूलर), श्रमिक मुक्ती दल अशा तेरा पक्षांची प्रागतिक पक्ष महाराष्ट्र अशी आघाडी केली आहे. या आघाडीची सांगलीत बैठक झाली. यावेळी बाबासो देवकर बोलत होते. या बैठकीत आघाडीच्या सांगली जिल्हा समन्वयकपदी दिगंबर कांबळे यांची निवड केली आहे.यावेळी लाल निशाण पक्षाचे कॉ. अतुल दिघे, शेकापचे ॲड्. अजित सूर्यवंशी, सुभाष पाटील, प्रा. बाबुराव लगारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नंदकुमार हत्तीकर, संदीप कांबळे, शरद पाटील, पांडुरंग जाधव, सूर्यकांत पाटील, बाबुराव जाधव, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलाचे जनार्दन गोंधळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. नितीन पाटील, योगेश नाडकर्णी, लाल निशाण पक्षाचे कॉ. गोपाळ पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा दि. ४ सप्टेंबर रोजी महासैनिक दरबार हाॅल, कोल्हापूर येथे होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक