शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तर बँकेसमोरील अडचणी वाढू शकतात; बड्या संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया मार्चनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:46 IST

एकीकडे कृषी कर्जाचा दरवर्षी फटका बसत असताना, दुस-या बाजूस बिगरशेती कर्जदार संस्थाही अडचणीत आल्या आहेत. शेतीकर्जातून तोटा सोसणाºया सांगली जिल्हा बँकेला दरवर्षी बिगरशेती कर्जातून मोठा नफा मिळत असतो. यंदा तशी परिस्थिती नाही.

ठळक मुद्देजिल्हा बँकेस २0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. २0१७-१८ या आर्थिक वर्षापेक्षा ३२ कोटींनी मागीलवर्षी नफा वाढला होता.

सांगली : जिल्हा बॅँकेच्या कृषी आणि अकृषिक कर्जाच्या थकबाकीचा डोंगर मोठा असल्याने त्यांच्या वसुलीचा प्रश्न बॅँकेसमोर निर्माण झाला आहे. सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत बॅँकेने सात बड्या संस्थांचा लिलाव जाहीर केला असला तरी, उर्वरीत आणखी आठ बड्या संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया मार्चनंतरच जाणार आहे. त्यामुळे वसुलीचा प्रश्न कायम राहणार आहे.

एकीकडे कृषी कर्जाचा दरवर्षी फटका बसत असताना, दुस-या बाजूस बिगरशेती कर्जदार संस्थाही अडचणीत आल्या आहेत. शेतीकर्जातून तोटा सोसणाºया सांगली जिल्हा बँकेला दरवर्षी बिगरशेती कर्जातून मोठा नफा मिळत असतो. यंदा तशी परिस्थिती नाही. जवळपास १२ संस्थांकडे ४५0 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यासाठी या संस्थांवर सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील केवळ सात संस्थांच्या लिलाव प्रक्रियेतून सुमारे अडीचशे कोटी रुपये मार्चअखेर मिळणार आहेत.

उर्वरित २00 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी बँकेला एप्रिल किंवा मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या नफ्यावर त्याचा परिणाम दिसून येईल. दरवर्षीप्रमाणे नफा होणार असला तरी, त्याचे प्रमाण कमी होणार आहे. एकीकडे नफा मिळविताना एनपीएचे प्रमाण वाढू नये म्हणून बँकेला दक्षता घ्यावी लागेल. सध्याचा एनपीए ११.८३ टक्के इतका असून, तो १४ टक्क्यांवर जाऊ नये म्हणून बँकेची धडपड सुरू आहे. एनपीए वाढला तर बँकेसमोरील अडचणी वाढू शकतात.

जिल्हा बँकेस २0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. २0१७-१८ या आर्थिक वर्षापेक्षा ३२ कोटींनी मागीलवर्षी नफा वाढला होता. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून गेल्या चार वर्षात सातत्याने नफावृद्धी होत आहे. मात्र संचालक मंडळाच्या अंतिम वर्षात हा नफा घटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MONEYपैसाbankबँक