शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

खासगी रुग्णालयांचा शुक्रवारी बंद; आयएमएचे देशव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:09 IST

Doctor, Hospital, MedicalAsosiation, morcha, sangli आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास शासनाने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयएमएशी संलग्नित सर्व खासगी रुग्णालये यादिवशी बंद राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देदेशभरातील खासगी रुग्णालयांचा शुक्रवारी बंद;आयएमएचे देशव्यापी आंदोलनआयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी परवानगीला विरोध; मार्डचाही पाठिंबा

सांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास शासनाने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयएमएशी संलग्नित सर्व खासगी रुग्णालये यादिवशी बंद राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी ही माहिती दिली.शस्त्रक्रियेला परवानगीच्या निमित्ताने आयएमए आणि जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन या संघटना आमने-सामने आल्या आहेत. आयएमएने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आंदोलनाचे विविध टप्पे म्हणून ८ डिसेंबरला राज्यातील प्रमुख शहरांत डॉक्टर्स शांततेने निदर्शने करतील.

मास्क, पांढरा कोट आणि स्टेथेस्कोपसह वीस-वीस डॉक्टरांचे गट आंदोलनात सहभागी होतील. दुसरा टप्पा म्हणून देशभरातील सर्व खासगी वैद्यकीय सेवा शुक्रवारी बंद राहील. कोरोनासह अतिदक्षता विभाग मात्र सुरु राहतील.

संपाला मार्ड संघटनेने पाठिंबा दिल्याचे डॉ. दोरकर म्हणाले. संपाची दखल घेतली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आयएमएने दिला आहे. जिल्हास्तरावरही याचिका दाखल केल्या जातील.हे आहेत आयएमएचे आक्षेप...आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आयएमएने आक्षेप घेतला आहे. परवानगी दिलेल्या ५८ शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतल्याविना त्या करता येणार नाहीत, असा दावा केला आहे.

अपुऱ्या ज्ञानावर केलेल्या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी प्राणघातक ठरतील. मेडिकल कमिशनच्या परवानगीविना शासनाने जारी केलेल्या निर्णयाला कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही आयएमएने म्हटले आहे.

टॅग्स :docterडॉक्टरMorchaमोर्चाhospitalहॉस्पिटलSangliसांगलीMedicalवैद्यकीय