शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 20:00 IST

सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

ठळक मुद्देनिधी योग्य कामांवरच खर्च झाला पाहिजे. यात कोणतीही तडजोड करणार नाही. खातेप्रमुखांनी पदाधिकाºयांशी योग्य समन्वय ठेवूनच कारभार केला पाहिजे.

जिल्हा परिषद स्वीय निधीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष मोहीमजिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. सांगली जिल्हा परिषदेकडे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा यापूर्वी त्यांनी कार्यभार पाहिला आहे. त्यांनी प्रशासनाला उत्तम शिस्त लावली आहे. आता ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आले आहेत. जिल्ह्यातील विकासाबद्दल त्यांचे काय धोरण आहे, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : जिल्ह्याच्या विकासासाठीची तुमची संकल्पना काय आहे?उत्तर : याआधी मी सांगली जिल्हा परिषदेकडे काम केले असले तरी, पूर्वीच्या आणि आताच्या कामात खूप बदल झाला आहे. पूर्वी सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना प्रशासनाला शिस्त लावून त्यांच्या कारभाराला गती देण्याचे काम होते. ते प्रामाणिकपणे तसेच चांगले केले. आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार करायचा आहे. या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामाला गती द्यावी लागणार आहे. खातेप्रमुखांना गती देण्याबरोबरच शासनाकडून निधीचीही उपलब्धता करावी लागणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचल्या की नाही, याचेही सामाजिक आॅडिट मला करावे लागणार आहे. सध्या पूर्वीपेक्षा निश्चितच माझी जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते, बेघरांना निवारा, पशुधनाचे आरोग्य चांगले ठेवून दुग्ध व्यवसाय वाढविणे आणि शेतकºयांच्या बांधापर्यंत खते, बियाणांचा पुरवठा करण्यास माझे प्रथमप्राधान्य असून, त्यादृष्टीने सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.

प्रश्न : जिल्हा परिषदेकडे स्वीय निधी अत्यंत तुटपुंजा आहे. या परिस्थितीमध्ये खड्डेमुक्त जिल्ह्यासह ग्रामीण जनतेच्या समस्या कशा सोडविणार?उत्तर : जिल्हा परिषदेचे स्वीय निधीचे उत्पन्न तुटपुंजे असले तरी, ते वाढविण्यासाठीही माझा प्रयत्न असणार आहे. जिल्हा परिषद मालकीच्या सर्व विभागाकडील जागांवरील अतिक्रमण हटवून त्या ताब्यात घेण्यासाठी प्रथमप्राधान्य असणार आहे. मोकळ्या जागांबरोबरच सध्या जिल्हा परिषदेचे काही ठिकाणी गाळे असून, त्यांच्या भाड्यात वाढ करण्यात येईल. जिल्हा परिषदेचे ठोस उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने नवीन योजना राबविण्याच्यादृष्टीने खातेप्रमुख आणि पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात ८५०० हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी ५००० किलोमीटर रस्त्यांवर खड्डे आहेत. हे खड्डे मुजविण्यासाठी उपलब्ध निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

प्रश्न : पदाधिकारी आणि खातेप्रमुखांमध्ये समन्वय नसल्यामुळे निधी खर्च होत नाही. या विसंवादावर तुम्ही कसा तोडगा काढणार आहात?उत्तर : जिल्ह्याच्या विकासाला गती द्यायची असेल तर, पदाधिकारी आणि खातेप्रमुखांमध्ये उत्तम संवाद असलाच पाहिजे. त्यादृष्टीने खातेप्रमुखांना सूचना देण्यात येतील. पदाधिकारी ग्रामीण भागामध्ये थेट जनतेत रोज फिरत असतात. पदाधिकाºयांनी चांगल्या योजना सुचविल्या, तर त्यांची अंमलबजावणी करण्यात काहीच अडचण नाही. खातेप्रमुखांनी पदाधिकाºयांशी योग्य समन्वय ठेवूनच कारभार केला पाहिजे. तो निश्चित चांगल्या पध्दतीने होईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

प्रश्न : समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागांकडील निधीच खर्च होत नाही. लाभार्थी मिळत नसल्याची तक्रार खातेप्रमुखांची असते. यावर कसा तोडगा काढणार?उत्तर : स्वीय आणि शासनाकडून मिळालेला शंभर टक्के निधी खर्च करणे हेच माझे पहिले उद्दिष्ट आहे. तो निधी योग्य कामांवरच खर्च झाला पाहिजे. यात कोणतीही तडजोड करणार नाही. मार्च एन्डची वाट पाहण्याची गरज नसून, निधी मिळाला की तो खर्च होईल.                                                                                                                           - अशोक डोंबाळे, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद