शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सांगली जिल्हा बँकेतील खातेदार मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम मार्चपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. नंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठराविक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. परंतु आजही बहुतांश शेतकरी पहिल्याच हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा बँकेतील खातेदार शासन मदतीपासून वंचितबहुतांश शेतकरी पहिल्याच हप्त्याच्या प्रतीक्षेत

निवास पवार शिरटे/सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम मार्चपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठराविक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. परंतु आजही बहुतांश शेतकरी पहिल्याच हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर मार्चपूर्र्वी २ हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँक वगळता जिल्हा बँकेतील मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. उर्वरित शेतकरी मात्र अजूनही पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मार्चनंतर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांचा दुसरा हप्ताही जमा झाला आहे. त्यामुळे ज्यांना पहिलाच हप्ता मिळालेला नाही, ते मात्र पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विकास सोसायटीचे सचिव यांच्याकडे अर्ज सादर केले. त्यांनीही ती यादी वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्द केली. परंतु ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत, त्यांनी संबंधितांशी चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही उत्तरे मिळत नाहीत. वंचित शेतकरी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात चौकशीसाठी हेलपाटे मारून थकले आहेत. प्रशासनाकडून त्यांना योग्य माहिती मिळत नाही, त्यामुळे कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारSangliसांगली