शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पशुखाद्य, औषधांचे दर तब्बल ४० टक्के वाढले, दूध उत्पादक शेतकरी महागाईने हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 17:46 IST

अतुल जाधव देवराष्ट्रे : दोन वर्षांपासून गाय दूध खरेदी दरात उत्पादनात खर्चाचा विचार करता कोणत्याही प्रकारची भरघोस वाढ न ...

अतुल जाधवदेवराष्ट्रे : दोन वर्षांपासून गाय दूध खरेदी दरात उत्पादनात खर्चाचा विचार करता कोणत्याही प्रकारची भरघोस वाढ न होता घटच झाली आहे. म्हैस दूध खरेदी दरात थोडीफार वाढ झाली आहे; मात्र खर्चही अव्वाच्या सव्वा वाढला आहे. पशुखाद्याच्या दरात तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. उत्पादन खर्चात सरासरी ५० टक्के वाढ झाल्यामुळे दूध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. उत्पादन घटूनदेखील खरेदी दरात कोणतीही वाढ होत नाही. त्यातच उत्पादन खर्च भरमसाट वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.राज्यातील सरकारने गाय दूध खरेदीसाठी फॅट ३/५ व ८/५ ‘एसएनएफ’साठी ३४ रुपये दर निश्चित केला. अधूनमधून सर्वच दूध संघांकडून दूध दरात घटच केली जात आहे. म्हैस दूध खरेदी दरात गेल्या पाच वर्षांत फक्त सात रुपये वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता ही वाढ नगण्य आहे. कोरोना, महापूर, दुष्काळ अशी अनेक संकटे सहन करीत दूध उत्पादक शेतकरी टिकून राहिला आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे दूध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे.पशुखाद्य व औषधोपचारात ४० टक्के वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत मजुरीचे दर दुप्पट वाढले आहेत. दूध उत्पादकांना दुधापासून मिळणारे उत्पन्न गेल्या दोन वर्षांत स्थिर राहिले आहे. वाढती महागाई व दुधातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक दूध उत्पादकांनी दुभत्या जनावरांची विक्री करून या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.गाय दुधास ३४ रुपये दर शासनाने ठरवून दिला आहे. मात्र, उत्पादन खर्चाच्या दृष्टीने सरासरी ४० रुपयावर दर मिळणे गरजेचे आहे. सध्या सरकी गोळी ३० ते ३५ रुपये किलो मिळत आहे. त्या प्रमाणात दुधालाही दर मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Sangliसांगली