शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : विनामोबदला दारू घरपोहोच करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:32 IST

दारूच्या दुकानांवर होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य संकट पाहता, जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेच्या भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय दारूप्रेमींना दारू घरपोहोच करण्याची तयारी दर्शविली आहे.

ठळक मुद्देविनामोबदला दारू घरपोहोच करण्याची तयारी गर्दीचे संकट टाळण्याचे आवाहन

सांगली : दारूच्या दुकानांवर होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य संकट पाहता, जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेच्या भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय दारूप्रेमींना दारू घरपोहोच करण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशी परवानगी द्यावी किंवा त्यांच्या यंत्रणेमार्फत दारू घरपोहोच करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शंभुराज काटकर यांनी केली आहे.संघटनेचे अध्यक्ष काटकर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, कैस अलगर, अजित राजोबा यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात काटकर यांनी म्हटले आहे की, गेला दीड महिना सांगली जिल्ह्याचे प्रशासन आणि शहरातील व्यापारी गर्दी टाळण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत.

आम्ही लोकांना सामान्य दरामध्ये भाजी घरपोहोच करण्याची सोय १११ भाजीपाला वाहनांद्वारे करीत आहोत. मात्र, दारूसाठी होणारी गर्दी आणि भर उन्हात तासन् तास लोकांना उभे करायला लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचारच केलेला नव्हता असे दिसते. त्यामुळे दीड-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आणि अजूनही तीन दिवसांनंतर त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

पाच फूट अंतरावर एक व्यक्ती उभी करण्याचे धोरण जाहीर झाले असेल आणि दुकानाच्या दारात तशी व्यवस्था केली तरी, ते पाळले जाईलच असे कुठेही दिसत नाही.देशी दारूच्या दुकानावर तर सहाशे-सातशे लोक एकमेकाला खेटून उभे असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. असेच सुरू राहिले तर सांगली संकटात सापडायला फार वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आम्हाला वाटते.

वास्तविक मद्य विक्रेत्यांना मागणीनुसार त्यांच्या परिसरात पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन उत्पादन शुल्क विभागाने केले पाहिजे. त्यांना जर ते शक्य नसेल, तर महापालिका क्षेत्रात आमच्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गाड्या फिरत आहेत, ते मोबदला न घेता केवळ कोरोना रोखण्यासाठी सेवा द्यायला तयार आहेत.

मद्य विक्रेत्यांनी आॅर्डर आणि आॅनलाईन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे स्वीकारून, मद्य ज्यांच्याकडे पोहोचवायचे असेल, त्यांचा पत्ता दिल्यास त्या भागातील विक्रेते भाजीपाल्याबरोबरच या वस्तू पोहोच करतील. मद्य पुरवणे चांगले की वाईट, या वादात न पडता, केवळ गर्दी टाळून आणि लोकांचे हाल न होता कोरोनाचे संकटही टाळावे, या उद्देशाने सेवा देण्याची तयारी आहे, असे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली