शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीची ग्रामपंचायतीत रंगीत तालीम, इच्छुकांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:08 IST

इच्छुक असणाऱ्या कारभाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले असून गाव कारभाऱ्यांना रसद पुरवण्यासाठी यंत्रणा लावली आहे.

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रंगीत तालीम होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या कारभाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले असून गाव कारभाऱ्यांना रसद पुरवण्यासाठी यंत्रणा लावली आहे.तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतीत भाजप किंवा राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आमदार आणि खासदारांना तालुक्यावर वर्चस्व सिद्ध करायचे असल्यामुळे यावेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन्ही गटात अटीतटीच्या होणार, हे निश्चित आहे.गेल्या वेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी सुंदाेपसुंदी झाली होती. अनेक ठिकाणी भाजप-राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येऊन निवडणुका लढवल्या होत्या. मात्र कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा कायम राहावा, यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे. गावातील पक्षांतर्गत दुफळी मिटवून एकसंध पॅनल लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांनी स्वतःच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होण्यासाठी ग्रामपंचायतीत आपल्या पक्षाच्या कारभाऱ्यांना रसद देऊन, आगामी निवडणुकीचा मार्ग सोपा करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांकडून स्वतःच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीतील गाव कारभाऱ्यांशी संपर्क साधून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची साखर पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकंदरीतच तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत