शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा फायदा होईल, अशाच कामांना प्राधान्य -- नितीन कापडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:09 IST

महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. प्रशासनालाही सहकार्य करते. त्यामुळे चांगले काम करता येईल - नितीन कापडणीस

ठळक मुद्देउद्याने, क्रीडांगणे, रस्ते रुंदीकरणावर भर

शीतल पाटील ।

महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. प्रशासनालाही सहकार्य करते. त्यामुळे चांगले काम करता येईल - नितीन कापडणीस

सांगली महापालिकेचे चार वर्षे उपायुक्त म्हणून काम केल्यानंतर आता आयुक्त म्हणून रूजू झालेले नितीन कापडणीस यांच्याशी शहरातील समस्या, भविष्यातील व्हिजन, विकासकामे,

फायलींचा निपटारा याबाबत केलेली बातचित...प्रश्न : महापालिकेच्या विकासाबाबत आयुक्त म्हणून आपले व्हिजन काय आहे?उत्तर : महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. या शहरात मोठे प्रकल्प व भरीव कामे करण्यावर भर राहणार आहे. उद्याने, क्रीडांगणे, फुड झोन, रस्ते अशी मोठी कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. महापालिकेकडे अनेक मोकळे भूखंड आहेत. तेथे हे प्रकल्प उभे राहू शकतात. रुग्णालयांची स्थिती सुधारण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ही तयार करीत आहोत. जनतेचा जास्तीत जास्त फायदा होईल, अशीच कामे करणार आहोत.

प्रश्न : माजी आयुक्त व सत्ताधाऱ्यांत संघर्ष झाला. त्या पार्श्वभूमीवर आपण आयुक्तपदाचा कार्यभार घेतला. त्यांच्याशी समन्वय कसा साधणार?उत्तर : महापालिकेत चार वर्षे उपायुक्त म्हणून काम केले आहे. येथील पदाधिकारी, नगरसेवक, जनता या साऱ्यांशी जुळवून घेऊन त्यांच्याशी समन्वय साधून काम करू. कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही. प्रत्येक निर्णयात सर्वांना सामावून घेतले जाईल. 

प्रश्न : विकासकामे, फायलींचा निपटारा याचे काय नियोजन केले आहे?उत्तर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी वर्ग तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यांच्याबद्दल जनतेचा जो समज झाला आहे, तो प्रथम बदलावा लागेल. त्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आर्थिक नियोजन. महापालिकेचे वर्षभरातील उत्पन्न, शासनाकडून येणारा निधी, मोठ्या योजनांच्या पूर्ततेसाठी खर्च होणारा निधी या साºयाची सांगड घालून उरलेल्या पैशातून विकासकामे करण्यावर भर राहणार आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही पावले उचलत आहोत.प्रभाग समित्या सक्षम करणारमहापालिकेच्या चार प्रभाग समित्या सक्षम करण्यावर भर आहे. समितीच्या सहायक आयुक्तांनाही काही अधिकार दिले जातील. पण त्यासाठी सक्त नियम व अटी तयार करणार आहोत. जेणेकरून त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही.रस्ते रुंदीकरण करणारअतिक्रमणाबाबत योग्य ते नियोजन केले जाईल. प्राधान्याने रस्ते रुंदीकरणावर भर आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणार आहोत. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल.स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करूमहापालिकेच्यावतीने स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचे नियोजन करीत आहोत. महिन्यातून एकदा आयएएस, आयपीएस अधिकाºयांचे मार्गदर्शन शिबिर घेणार आहोत. त्यातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होईल.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त