जत : माडग्याळ (ता. जत) येथील प्रदीप करगणीकर यांची सांगली जिल्हा शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
तर शिवसेनेच्या (पश्चिम) तालुका प्रमुखपदी माजी सभापती संजय सावंत तर अंकुश हुवाळे यांची पूर्व भागाच्या तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाबुराव दुधाळ यांचे चिरंजीव अमित उर्फ बंटी दुधाळ यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदीप करगणीकर यांनी यापूर्वी तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी माडग्याळ ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा झेंडा फडकवला होता. संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून बनाळी ते पंढरपूर पायी दिंडी काढली होती. तर अंकुश हुवाळे हे यापूर्वी तालुकाप्रमुख पदावर होते. बंटी दुधाळ हे युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत होते.