शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

असंगठीत कामगारांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:55 IST

सांगली : विकास आयुक्त (हातमाग) नवी दिल्ली यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली असून ही योजना असंगठीत ...

ठळक मुद्देअसंगठीत कामगारांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना60 पर्यंत नियमित सहभाग रक्कम भरावी लागणार

सांगली : विकास आयुक्त (हातमाग) नवी दिल्ली यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली असून ही योजना असंगठीत कामगारांना पेन्शन देण्याकरीता सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इतर कामगारांसह हातमाग कामगारांनाही या योजनेत समाविष्ठ करण्यात आले आहे. अशी माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर यांनी दिली.या योजनेत सहभागी होणाऱ्या विणकरांना वय वर्षे 60 नंतर मासीक 3 हजार रूपये इतकी दरमहा पेन्शन मिळेल. योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वर्षापर्यंतचे हातमाग कामगार पात्र असतील. या हातमाग कामगाराचे मासीक वेतन 15 हजार रूपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.या योजनेत भाग घेण्यासाठी हातमाग कामगारांनी आपल्या परिसरातील कॉमन सर्वीस सेंटर येथे नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणीकामी हातमाग कामगारांना त्यांचे आधार कार्ड, बचत व जनधन बँक खात्याबाबत व मोबाईल नंबर याबाबत माहिती आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी वयाप्रमाणे 55 रूपये ते 200 रूपये प्रतिमाह वय वर्षे 60 पर्यंत नियमित सहभाग रक्कम भरावी लागणार आहे. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीGovernmentसरकारSangliसांगली