शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

पाववाला ते मिरजेचे आमदार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:00 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाववाला ते मिरजेतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून येणाºया हाफिज धत्तुरे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. आपल्यातील साधेपणाने त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची मने जिंकली. सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच जनतेचे नेतृत्व ठरले. अशा या कार्यक्षम माजी आमदाराचे निधन मंगळवारी रात्री झाले. मिरजेतील या लोकप्रिय नेत्याच्या जीवनयात्रेची अखेर त्यांच्या ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाववाला ते मिरजेतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून येणाºया हाफिज धत्तुरे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. आपल्यातील साधेपणाने त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची मने जिंकली. सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच जनतेचे नेतृत्व ठरले. अशा या कार्यक्षम माजी आमदाराचे निधन मंगळवारी रात्री झाले. मिरजेतील या लोकप्रिय नेत्याच्या जीवनयात्रेची अखेर त्यांच्या जन्मदिनालाच झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.हाफिज धत्तुरे यांचा जीवन प्रवास संघर्षमय राहिला आहे. सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या फोटोफ्रेम बनवण्याचा व्यवसाय होता. हे त्यांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन. या व्यवसायावर कुटुंबाचे पालनपोषण कसेबसे होत असे. त्यामुळे नोकरीच्या शोधात धत्तुरे यांनी मुंबई गाठली. कापड गिरणीत नोकरी मिळाली. पॉवरलूमवर ते काम करू लागले. येथेच त्यांनी कामगारांचे जीवन अनुभवले. गिरणी कामगार म्हणून काम करताना त्या काळातील समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मात्र, मुंबईपेक्षा त्यांचा ओढा हा मिरजेकडे होता. त्यामुळे त्यांनी मिरजेत येऊन आपला वडिलोपार्जित फोटोफ्रेमचा व्यवसाय करण्याचे ठरवले. जत्रा, यात्रा, उरूसात, उत्सवात फोटोफ्रेमची विक्री केली.१९७० मध्ये हाफिज धत्तुरे यांनी बेकरी व्यवसायात प्रवेश केला. याच बेकरी व्यवसायाने त्यांची जडण-घडण केली. पाववाला म्हणून मिरज शहराला ते परिचित झाले. सामाजकारण त्यांना राजकारणात येण्यास खुणावू लागले. त्यामुळे त्यांनी मिरज नगरपालिकेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना या निवडणुकीत अपयश आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी हे तत्त्व मानून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.१९९९ मध्ये मिरजेत विधानसभेसाठी त्यांना आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना व काँग्रेस युतीची विधानसभेची उमेदवारी मिळाली. तत्कालीन जनता दलाचे आमदार शरद पाटील यांच्याविरोधात ओबीसी संघटनेची उमेदवारी घेण्यास कोणीही तयार नसल्याने हाफिज धत्तुरे यांच्या गळ्यात ही माळ पडली. विधानसभा निवडणुकीत पाववाला म्हणून त्यांची हेटाळणी झाली. काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुध्द बंड केले; मात्र सिनेअभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रचारसभेने वातावरण बदलले. धत्तुरे यांनी तब्बल १२ हजार मताधिक्याने निवडून येऊन चमत्कार घडविला. मिरज मतदार संघातून प्रथमच अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले.जनतेचा नेता अशी ओळख असलेल्या धत्तुरे यांनी स्वतंत्र मिरज नगरपालिका, बकºयांसाठी स्वतंत्र कत्तलखाना, स्वतंत्र औद्योगिक नगरी, वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा, रस्त्यावर उतरून आंदोलने केली. सामान्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाशी संघर्ष केला. राजकीय अपेक्षा, महत्त्वाकांक्षा मोठ्या नसल्याने व राजकीय मतभेद झाल्याने त्यांनी मुस्लिम ओबीसी संघटनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. या विजयाने ते सर्वसामान्यांचे नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलने करणाºया धत्तुरे यांनी अतिक्रमणे हटविताना खोकीधारकांचे समर्थन करीत फेरीवाल्यांचे प्रथम पुनर्वसन करा मगच खोकी हलवा, असा पवित्रा घेत जेसीबी यंत्रासमोर आडवे पडून अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार विरोध केला होता. आमदार असूनही साध्या राहणीमुळे आमआदमी अशी धत्तुरे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने गरिबांच्या अडचणी समजावून घेऊन समस्या सोडविण्यासाठी धडपडणारा नेता हरपला आहे.मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्याची धत्तुरे यांची इच्छा होती. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीच्या मागणीस प्रतिसाद न दिल्याने त्यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून खळबळ उडवून दिली होती. मात्र ते बंड थांबवण्यात आले होते.लाल दिव्याची गाडीहाफिज धत्तुरे यांना पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद व राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला होता. त्यांच्यामुळे मिरजेला पहिल्यांदाच लाल दिव्याची गाडी मिळाली. प्रशासनाशी संघर्ष करणाºया हाफिजभार्इंनी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना हटविण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून महापालिका व आयुक्तांविरुध्द, काही वेळेस स्वपक्षीय शासनाविरुध्द त्यांनी संघर्ष केला.