शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचा थकबाकीमुळे वीज तोडली, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:06 IST

रुग्णालयाचे भवितव्य काळोखात 

मिरज : आर्थिक अडचणीमुळे बंद असलेल्या मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे बंद केल्याने रुग्णालयाचे भवितव्य अंधारात गेले आहे. भवितव्य टांगणीवर असल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.सुमारे १३० वर्षांच्या रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वॉन्लेस रुग्णालयातील सुमारे चारशे कर्मचारी गेले तीन वर्षे पगार नसल्याने हवालदिल आहेत. सुमारे ४० लाख थकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज खंडित झाला आहे. सुमारे ७० लाख पाणीबिल थकीत आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने रुग्णालयाची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.कामगारांचे सुमारे २५ कोटी रुपये वेतन थकीत आहे. या पार्श्वभूमीवर नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम डेव्हलपमेंट या संस्थेकडे रुग्णालय हस्तांतरणाचा सामंजस्य करार झाला आहे. मात्र, करार होऊनही तांत्रिक अडचणीमुळे वॉन्लेस सुरू झालेले नाही.

व्यवस्थापनाने दिली पोलिसांत तक्रारवान्लेस रुग्णालयात परिचारिका व फिजिओथेरेपी महाविद्यालय चालविण्यात येते. गेले दोन आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने वसतिगृहातील विद्यार्थी अंधारात राहात आहेत. महाविद्यालयाच्या कार्यालयात आणलेला जनरेटरची कोणीतरी मोडतोड केल्याने व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटलelectricityवीज